मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अखेर प्रशासनाला आली जाग, छकुलीला स्पेशल वॉर्डमध्ये हलवलं

अखेर प्रशासनाला आली जाग, छकुलीला स्पेशल वॉर्डमध्ये हलवलं

chakuli22 नोव्हेंबर : गेल्या 28 दिवसांपासून अक्षम्य दुर्लक्षामुळे एका बलात्कार पीडित छकुलीची हॉस्पिटलमध्ये हेळसांड होत होती. आयबीएन लोकमतने या छकुलीची व्यथा मांडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता तिची काळजी घेण्यास सुरुवात केलीये. 9 वर्षांच्या या छकुलीला मध्यरात्रीच स्पेशल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. आज सकाळी सायन हॉस्पिटलच्या डेप्युटी डीननी तिची भेट घेऊन चौकशी केलीय. सोबतच तिच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच या मुलीला तातडीने महानगरपालिकेच्या खर्चानं एखाद्या चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 140 जणांची चौकशी केलीय. त्यापैकी काहींचं डीएनए सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आलंय अशी माहिती डीसीपी जयकुमार यांनी दिलीय. जयकुमार यांनी दुपारी या मुलीची भेट घेतली. लवकरच आरोपीला अटक करू असा विश्वास डीसीपी जयकुमार यांनी व्यक्त केला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Rape, Rape case, बलात्कार, वडाळा, सायन हॉस्पिटल

पुढील बातम्या