22 जुलै : उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबईतील ग्लास हाऊस अखेर तोडायला सुरूवात झाली आहे. आज सकाळपासून गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांनी स्वत:हून हे ग्लास हाऊस तोडायला सुरूवात केली आहे. नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये हे ग्लास हाऊस आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून हे ग्लास हाऊस बांधण्यात आलं होतं. त्यामुळे हायकोर्टाने हे ग्लास हाऊस तोडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 20 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने नवी मुंबई महापालिकेनं हे ग्लास हाऊस तोडावं, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. दिलेल्या मुदतीत हे ग्लास हाऊस तोडलं गेलं नाही. मात्र आता खुद्द नाईक कुटुंबीयांनी हातात हातोडा घेतलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.