मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /अखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं

अखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं

  f3campa_cola23 जून : अखेर कॅम्पा कोलावर मुंबई पालिकेनं कारवाईला सुरुवात केलीय. कॅम्पाकोलातील अनधिकृत मजल्यांवर कारवाई सुरू झाली असून एकूण 12 टीम्स कॅम्पाकोलावरच्या या कारवाईत सामील आहेत. यात एकूण 90 फ्लॅट्सचा वीज आणि गॅस पुरवठा तोडण्यात आलंय.

  कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी माघार घेतल्यानंतर आज पालिकेच्या कर्मचार्‍यांना कारवाई करण्यास मोकळीक मिळाली. आज कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना सोसायटीची गेट्स उघडून आत यायची परवानगी दिली. पालिकेचे अधिकारी या अनधिकृत 102 फ्लॅट्सचं वीज आणि गॅस कनेक्शन तोडणार असल्याचं अगोदरच पालिकेनं स्पष्ट केलं होतं त्यानंतर अनधिकृत मजल्याची तोडफोड करण्यात येणार आहे.

  रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर कॅम्पा कोलातल्या रहिवाशांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे कारवाईसाठी पालिकेचा मार्ग मोकळा झालाय.

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

  [if0] [sc0]

  +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  First published:

  Tags: BMC, Campacola, Last day, Mumbai, Sc, Supreme court decision, Varli