Elec-widget

आता ड्रोननं होणार Food Delivery; या कंपनीनं घेतला निर्णय

आता ड्रोननं होणार Food Delivery; या कंपनीनं घेतला निर्णय

Online Food Order : आता ड्रोननं होणार तुमच्या खाण्याची डिलिव्हरी.

  • Share this:

मुंबई, 13 जून : Online Food Order केल्यानंतर Delivery Boy दारात उभा राहतो. साधारण अर्धा तास यासाठी लागतो. पण, तुम्हाला Droneनं Food Delivery केली तर? वाचून आश्चर्य वाटलं ना? पण, पुढील काळात तुमची Food Delivery ही Droneच्या माध्यमातून केली जाऊ शकते. Zomatoनं बुधवारी ( 12 जून ) रोजी याची घोषणा केली आहे. शिवाय, ड्रोननं करण्यात येणाऱ्या डिलिव्हरीची चाचणी देखील यशस्वी पार पडली आहे. यासाठी Zomatoनं हायब्रिड ड्रोनचा वापर केला आहे. ड्रोनचा वापर हा 5 ते 10 किलो मीटर अंतरावरील Food Delivery करता केला जाणार आहे. 5 किलो वजन घेऊन उडणाऱ्या या ड्रोनचा वेग हा 80 किमी प्रति तास असणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. शिवाय, ग्राहकांना देखील जास्त वाट पाहावी लागणार नाही.
काय आहे प्लॅन

ड्रोनच्या माध्यमातून Food Delivery केली जाऊ शकते का? याबाबत झोमॅटोनं TechEagle Innovations या स्टार्टअपची खरेदी केली होती. TechEagleनं तयार केलेला ड्रोन हा आता Online Food Deliveryसाठी वापरला जाणार आहे. दरम्यान, झोमॅटोच्या ड्रोन वापरामुळे ऑनलाईन ऑर्डर केलेलं खाणं आता वेळेत पोहोचणार आहे.


विराटसेनेसाठी धोक्याची घंटा, नॉटिंगहॅममध्ये पुन्हा पाऊस

Amazon सुरू करू शकते सेवा

बाईकवरून Food Delivery करण्यासाठी साधारण 30 मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळे कमी वेळेत डिलिव्हरी होण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय झोमॅटोनं घेतला आहे. जगभरातील अनेक कंपन्या सध्या ड्रोनच्या मदतीनं डिलिव्हरी करतात. ई कॉमर्स कंपनी Amazonनं देखील यापूर्वी ड्रोनच्या मदतीनं डिलिव्हरीची घोषणा केली आहे.


मंत्रिमंडळ विस्ताराचा उद्याचा मुहूर्त टळला; सस्पेन्स कायम

सरकार करणार नियम

ड्रोन्सच्या माध्यमातून डिलिव्हरी करण्यास अद्याप तरी नियमांची आडकाठी आहे. शिवाय, ड्रोन्सच्या उड्डाणासाठी काही नियमावली देखील आहे. पण, कंपन्यांचा विचार करता सरकार या नियमांमध्ये बदल करू शकते.


औरंगाबाद मनपामध्ये गोंधळ, एमआयएम-शिवसेना आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...