'झोमॅटो'ची वेबसाईट हॅक, 1.7 कोटी युझर्सचा डेटा चोरीला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 02:43 PM IST

'झोमॅटो'ची वेबसाईट हॅक, 1.7 कोटी युझर्सचा डेटा चोरीला

18  मे : अनेक देशांमधल्या 10 हजार शहरांतील ग्राहकांना सेवा देणाऱ्या 'झोमॅटो' या फूड-टेक कंपनीची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 'झोमॅटो'च्या 1.7 कोटी ग्राहकांचे ई-मेल आयडी आणि हॅश्ड पासवर्डही चोरले आहेत.

झोमॅटो फूड टेक कंपनी युझर्सना त्यांच्या आजू-बाजूच्या हॉटेलची, तिकडेच्या खाण्यांची माहिती पुरवते. कंपनीच्या वेबसाईटवरून मागवलेले पदार्थ घरपोचही मिळतात. मात्र ही सुविधा मिळवण्यासाठी युझर्सला आधी वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. यूझर्सचे नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता या सारख्या माहिती साईटवर नोंदवावी लागते. भारतातही मोठ्या प्रमाणात या वेबसाईटचा वापर केला जातो. ही वेबसाइट हॅक झाल्यामुळे जवळपास 1 कोटी 70 लाख युझर्सचे ई-मेल आयडी आणि पासवर्ड चोरल्याची माहिती हॅकरीड या सिक्युरिटी ब्लॉगकडून देण्यात आली आहे.

दर महिन्याला जवळपास 9 कोटी युझर्स या वेबसाईटला भेट देतात. वेबसाईट हॅक झाल्याने ग्राहकांची सर्व वैयक्तिक माहिती हॅकरपर्यंत पोहोचणे सहज शक्य होऊ शकते.  झोमॅटो या कंपनीविरोधात भारतीय कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. या कायद्यांतर्गत वेबसाईटच्या असुरक्षिततेमुळे युझर्सची माहिती चोरीला गेल्यामुळे युझर्सला कंपनीकडून नुकसान भरपाईही दिली जाऊ शकते.

दरम्यान, आमच्याजे असलेल्या युझर्सचा डेटा हॅक होऊ नये, यासाठी कंपनी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. काही यूझर्सचे ई-मेल आयडी आणि इतर डेटा चोरला असला तरी त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती आणि इतर अर्थिक बाबींची माहिती  सुरक्षित आहे. ती अजिबात हॅक होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...