बिफ व पोर्कवरून Zomato पुन्हा वादात सापडली; 'डिलीव्हरी बॉय म्हणाले...'

ऑनलाईन फूडची सेवा देणारी झोमॅटो (Zomato) कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 06:26 PM IST

बिफ व पोर्कवरून Zomato पुन्हा वादात सापडली; 'डिलीव्हरी बॉय म्हणाले...'

कोलकाता, 11 ऑगस्ट: ऑनलाईन फूडची सेवा देणारी झोमॅटो (Zomato) कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कंपनीच्या एका डिलीव्हरी बॉयने (Delivery Boys) असा आरोप केला आहे की, कंपनी मला अशा पद्धतीचे जेवण डिलिव्हरी करण्यास भाग पाडत आहेत ज्यामुळे माझी धार्मिक भावना दुखावली जात आहे. विशेष म्हणजे या कारणावरून कंपनीचे काही डिलीव्हरी बॉय संपावर जाणार आहेत. या सर्व डिलीव्हरी बॉयचे असे म्हणणे आहे की, ते बिफ (Beef) आणि ब्वॉयज पोर्क (Pork) हे दोन पदार्थ डिलिव्हरी करणार नाहीत.

Zomatoसाठी डिलीव्हरी बॉयचे काम करणारा बजरंग नाथ वर्माने सांगितले की, ज्या बॅगेतून आम्ही जेवण लोकांना डिलीव्हर करतो. तीच बॅग आम्ही घरी घेऊन जातो. बिफ सारखे पदार्थ डिलीव्हरी केल्यामुळे आमच्या भावना दुखवल्या जातात. Zomatoमध्ये काम करणारा आणखी एक डिलीव्हरी बॉय मोहसिन अख्तर म्हणाला, आम्ही पोर्क डिलीव्हरी करणार नाही. जेवण डिलीव्हर केले नाही म्हणून काही डिलिव्हरी बॉयवर Zomatoने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. Zomatoकडून त्यांना धमकी देखील दिली जात आहे.

या सर्व प्रकरणानंतर राज्य मंत्री राजीब बॅनर्जी यांनी या घटनेची दखल घेतली आहे. कंपनीने कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या विरुद्ध वागण्यासाठी जबरदस्ती करत येणार नाही. यासंदर्भात तक्रार मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे बॅनर्जी म्हणाले.

काहीच दिवसांपू्र्वी Zomatoचा एक वाद समोर आला होता. जबलपूरमधील एका व्यक्तीने मुस्लिम डिलीव्हरी बॉय असल्याचे कारण देत ऑर्डर रद्द केली होती. त्यावरून सोशल मीडियावर देखील चर्चा झाली होती.

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Zomato
First Published: Aug 11, 2019 06:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...