नोएडा, 16 फेब्रुवारी : ऑनलाइन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढल्यानंतर त्यात फसवणूक होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. ऑनलाइन पेमेंट करताना खात्यावरून अधिक रक्कम काढली गेल्याचे प्रकार घडले आहेत. आताही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवरून मागवलेला पिझ्झा न खाता तब्बल एक लाख रुपयांना पडला आहे. महिलेनं पिझ्झा खराब असल्याची तक्रार केली आणि ऑर्डर कॅन्सल केली. त्यानंतर महिलेच्या खात्यावरून एक लाख रुपये कमी झाले.
उत्तर प्रदेशातील नोएडात राहणाऱ्या श्वेताला ऑनलाइन फसवणुकीचा सामना करावा लागला. झोमॅटोवरून पिझ्झा ऑर्डर केला. पण तो खराब असल्याने कस्टमर केअरकडे तक्रार केली. मात्र तिला मोठा फटका बसला. श्वेताने आरोप केला की, झोमॅटोच्या कस्टमर केअरला फोन करून पिझ्झा मागवला. त्याचे पैसेही दिले. त्यानंतर खात्यातून तब्बल 1 लाख रुपये काढले गेले.
ऑनलाइन व्यवहार करताना युपीआय खात्यातून फसवणूक करून पैसे काढले गेल्याचा आरोप श्वेताने केला आहे. युपीआय खाते झोमॅटो अॅपला लिंक केलं होतं. याच्या माध्यमातून पहिल्यांदा पिझ्झाचे बिल घेतले गेले आणि लगेच एक लाख रुपयेही पाठवल्याचा मेसेज आला.
झोमॅटोची ऑर्डर कॅन्सल केल्यानंतर रिफंडसाठी एक लिंक पाठवण्यात आली होती. जेव्हा त्या लिंकवर क्लिक केलं तेव्हा युपीआय खातं हॅक झालं. त्यानंतर दोन दिवसांच्या काळात खात्यावरून एक लाख रुपये काढण्यात आले. जेव्हा कस्टमर केअरच्या मिळालेल्या नंबरवर कॉल केला असता त्याचा झोमॅटोशी काही संबंध नसल्याचंही समोर आलं आहे. झोमॅटोने त्यांचा असा कोणताच कस्टमर केअर नंबर नसल्याचं म्हटलं आहे.
वाचा : भांडणाच्या रागातून तरुणाला भर बाजारातच संपवलं, चाकूने केले सपासप वार
याप्रकरणी श्वेताने पेठीएमच्या ग्राहक सेवा अधिकाऱ्यांना फोन केला. या फसवणूकीची मामहिती बँकेला देण्यात आली आहे. त्यानंतर बँकेने पैसे 8-9 खात्यांवर पाठवले गेल्याचं म्हटलं. त्यानंतर श्वेताची सर्व खाती ब्लॉक करण्यात आली असून चौकशी केल्यानंतर जर तिचे म्हणणे योग्य ठरल्यास पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.
वाचा : 9 महिन्यात 18 सरकारी बँकांना फसवणुकीने बुडवलं, 1.17 लाख कोटींचा दणका