Zomato: मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर न घेणाऱ्याला पोलिसांचा दणका!

Zomato: मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून ऑर्डर न घेणाऱ्याला पोलिसांचा दणका!

मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार देणाऱ्या अमित शुक्ल याला आता पोलिसांनी दणका दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: मुस्लीम डिलिव्हरी बॉयकडून जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार देणाऱ्या अमित शुक्ल याला आता पोलिसांनी दणका दिला आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील रहिवासी असलेल्या अमितला या प्रकरणानंतर पोलिसांनी नोटस बजावली आहे. Zomatoवरून दिलेली ऑर्डर मुस्लीम डिलिव्हरी बॉय घेऊन येत असल्याने ती घेण्यास नकार दिल्याच्या घटनेवर काल दिवसभरात सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणी Zomato अन्नाला कोणताही धर्म नसतो असे म्हटले होते. तर अमितने श्रावण महिन्यात मी मुस्लीम व्यक्तीकडून जेवण घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. सोशल मीडियावर युझर्सनी Zomatoची बाजू उचलून धरली होती तर काहींनी अमित बरोबर असल्याचे म्हटले होते.

पोलिसांनी अमित शुक्लला नोटीस बजावली आहे. अमितला लेखी स्वरुपात शपथ पत्र देण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. या शपथ पत्रात धार्मिक द्वेषाचा प्रसार करणार नाही, असे लिहून देण्यास सांगितले आहे. एकूणच या प्रकरणाची चर्चा सोशल मीडियावर अधिक झाली होती. अमितने घटनेचे Zomato कंपनी सोबत झालेल्या चॅटचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. काहींनी BoycottZomato हा हॅशटॅग देखील सुरू केला होता.

मी काय करू शकतो...; Zomatoच्या डिलिव्हरी बॉयने दिली हताश प्रतिक्रिया!

Zomatoवरून दिलेली ऑर्डर मुस्लीम डिलिव्हरी बॉय घेऊन येत असल्याने ती घेण्यास नकार दिल्याच्या घटनेवर काल दिवसभरात सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आता या प्रकरणातील संबंधित ऑर्डर घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमित शुक्ल नावाच्या या व्यक्तीने Zomato जेवणाची ऑर्डर दिली होती. पण जेव्हा त्याला कळाले की ऑर्डर घेऊन येणारी व्यक्ती मुस्लीम आहे. यावर त्याने Zomatoला डिलीव्हरी बॉय बदलण्यास सांगितला. या गोष्टीला Zomatoने नकार दिल्याने अमितने ऑर्डरच रद्द केली आणि पैसे देखील देऊ नका असे सांगितले होते.

Zomatoसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या फैयाजने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. होय, या प्रकरणामुळे मी दु:खी झालो आहे. पण मी काय करू शकतो... लोक काहीही बोलतात. त्यावर मी काही करू शकत नाही. आमच्या सारख्या गरीब लोकांना अशा गोष्टी सहन कराव्या लागतातच.

Loading...

अमित शुक्ल नावाच्या व्यक्तीने सध्या श्रावण सुरु आहे आणि मुस्लिम व्यक्तीकडून डिलिव्हरीची गरज नाही, असे सांगत डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितला होता. पण Zomato डिलिव्हरी बॉय बदलण्यास नकार दिला. यावर अमित शुक्लने ऑर्डरच रद्द केली. या सर्व प्रकरणात Zomatoचे संस्थापक दिपेंद्र गोयल यांनी कंपनीने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. आम्हाला भारतीयत्वाचा अभिमान आहे. आमच्या मुल्यांना धक्का बसणारा कोणत्याही प्रकारचा नफा आम्हाला नको आहे.

सोशल मीडियावर या घटनेनंतर अनेकांनी Zomatoने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले होते. यात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी आदींचा समावेश होता. कंपनीने या सर्वांसह अन्य नेट युझर्सचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Zomato
First Published: Aug 1, 2019 03:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...