पाहा VIDEO : Zomatoच्या या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ झाला व्हायरल, यामुळे झालं कौतुक

पाहा VIDEO : Zomatoच्या या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ झाला व्हायरल, यामुळे झालं कौतुक

ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato पुन्हा एकदा चर्चेत आहे. याआधी Zomato चा डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर नाकारण्याचा प्रकार घडला होता. आता मात्र याच Zomato कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे Zomato च्या डिलिव्हरी बॉयचं कौतुक होतं आहे.

  • Share this:

वडोदरा, 2 ऑगस्ट : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Zomato पुन्हा एकदा चर्चेत आहे. याआधी Zomato चा डिलिव्हरी बॉय मुस्लीम असल्याने ऑर्डर नाकारण्याचा प्रकार घडला होता. आता मात्र याच Zomato कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे Zomato च्या डिलिव्हरी बॉयचं कौतुक होतं आहे.

हा व्हिडिओ गुजरातमधल्या वडोदराचा आहे, असं म्हटलं जातं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर 5 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. आणि याच पाण्याच्या लोंढ्यातून Zomato चा डिलिव्हरी बॉय त्याची बाइक सावरत पुढे चालला आहे. एवढ्या पावसांतही त्याने ग्राहकाला त्याचं लोकेशन विचारलं आणि त्याची ऑर्डर नेऊन दिली.

हा व्हिडिओ ऋत्विक पटेल नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे.यामध्ये Zomato हा डिलिव्हरी बॉय कुणालातरी फोन लावून त्याचा पत्ता विचारतो आहे. पाण्याच्या लोंढ्यात फसलेल्या या डिलिव्हरी बॉयला बाहेर काढण्यासाठी लोक मदत करतायत. हा व्हिडिओ केवळ 2 मिनिटं आणि 20 सेकंदाचा आहे.

वडोदरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असताना लोक घराच्या बाहेरही पडू शकत नव्हते. अशा स्थितीत हा डिलव्हरी बॉय त्याची ऑर्डर योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी जीवाची बाजी लावत होता.

पाहा VIDEO : Zomato नंतर नवा वाद, मुस्लीम अँकरला पाहून डोळे केले बंद

==============================================================================================

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 2, 2019, 8:23 PM IST

ताज्या बातम्या