• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ZOMATO वर तमिळ नागरिक संतापले, एका वाक्यामुळं खवळलं अख्खं राज्य

ZOMATO वर तमिळ नागरिक संतापले, एका वाक्यामुळं खवळलं अख्खं राज्य

फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोमधील (Zomato controversy over language in Tamil Nadu) एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे पूर्ण राज्य या कंपनीवर भडकलं आहे.

 • Share this:
  चेन्नई, 29 ऑक्टोबर : फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोमधील (Zomato controversy over language in Tamil Nadu) एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे पूर्ण राज्य या कंपनीवर भडकलं आहे. या वादाचं कारण फूड किंवा डिलिव्हरीशी संबंधित नसून भलतंच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, (Reject Zomato trend goes viral) या मुद्द्यावरून हा वाद पेटला असून तमिळनाडूमध्ये #rejectzomato हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे. काय आहे प्रकार? एका फूड डिलिव्हरीवरून तमिळनाडूमध्ये सगळं रामायण घडलं. विकास नावाच्या व्यक्तीनं झोमॅटोवरून काही पदार्थ ऑर्डर केले. या पदार्थांमध्ये त्याने ऑर्डर केलेला एक पदार्थ आला नाही. झोमॅटोला फोन करत त्याने याची तक्रार केली. त्यावर तुम्ही हॉटेलशी फोनवरून बोला, असा सल्ला त्यांना देण्यात आला. हॉटेलला फोन करून विकास यांनी आपलं म्हणणं सांगितलं. त्यावर तुम्ही झोमॅटोशीच बोला, असा सल्ला त्यांना मिळाला. धीर न सोडता त्यांनी पुन्हा झोमॅटोला फोन करत वस्तुस्थिती सांगितली. एक्झिक्युटीव्हनं दिला अजब सल्ला विकास यांनी त्यांच्याशी बोलणाऱ्या एक्झिक्युटीव्हला हॉटेलशी बोलून समस्या सोडवायला सांगितली. त्यावर आपण हॉटेलशी बोलण्यास असमर्थ असून आपल्याला तमिळ भाषाच येत नसल्याचं तो म्हणाला. त्यावर जर तुम्ही तमिळनाडूमध्ये व्यवसाय करत आहात, तर तमिळ बोलणाऱ्यांना नोकरीवर का ठेवत नाही, असा सवाल विकास यांनी केला. त्यावर एक्झिक्युटीव्हनं दिलेलं उत्तर ऐकून विकास यांना संताप आला. हिंदी ही राष्ट्रभाषा? आम्ही तमिळ शिकण्याऐवजी तुम्हीच हिंदी का शिकत नाही, असा सवाल एक्झिक्युटीव्हने केला. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असून प्रत्येकाला ती थोडी तरी यायला पाहिजे, असा सल्लाच एक्झिक्युटीव्हने देऊन टाकला. त्यावर भडकलेल्या विकास यांनी सोशळ मीडियावर हा संवाद टाकला आणि पाहता पाहता तमिळ जनता झोमॅटोला ट्रोल करू लागली. हे वाचा- दिवाळीत एकदम जबरदस्त दिसायचं आहे?, मग तरुणींनो वाचा ही बातमी कंपनीकडून दिलगिरी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. किंबहूना भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही, हे एक्झिक्युटीव्हला माहित नव्हतं. तरीही त्याच्यावर कारवाई करून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. या घटनेनंतरही झोमॅटोला तमिळनाडूमध्ये जोरदार ट्रोल केलं जात असून त्यावर अनेक मीम्स आणि कार्टून्स तयार होत आहेत.
  Published by:desk news
  First published: