मुंबई 14 जानेवारी : देशात आता निवडणुकीचं वातावरण तापू लागलं आहे. प्रत्येक नेता विजयाचा दावा करतोय. बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं म्हटल्याचा दावा भाजपचे नेते सुनील देवधर यांनी केला आहे.
सुनील देवधर हे भाजपचे मोठे नेते असून नॉर्थ इस्टच्या राज्यांमध्ये भाजपचं गेली कित्येत वर्ष ते काम करत आहेत. देवधर यांनी झीनत अमान यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करून ही माहिती दिलीय.
ते म्हणतात, "दिल्लीहून मुंबईला येत असताना माझी 70 च्या दशकातल्या सदाबहार अभिनेत्री झीनत अमान यांच्याशी भेट झाली. त्यांना जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की मोदी हे डायनामिक, दूरदृष्टीचे नेते आहेत. ते देशासाठी उत्तम काम करत असून त्यांना पुन्हा एकदा संधी मिळायला पाहिजे."
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडमधल्या कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली होती. तसच ते प्रश्न तातडीने सोडविण्याचं आश्वासनही दिलं होतं. यात करण जोहर, रणधीर कपूर, रणबीर सिंग यांच्यासह अनेक अभिनेत्यांचा समावेश होता.
While travelling from Delhi to Mumbai met evergreen Bollywood actress of 70s Zeenat Aman Ji.
— Sunil Deodhar (@Sunil_Deodhar) January 13, 2019
When I asked her views about @narendramodi Ji,she said that our Prime Minister is a dynamic & visionary leader doing great for the country.
He must get second term to serve this nation. pic.twitter.com/H8o44ZhDMX
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते त्यावेळीही बॉलिवूडमधल्या कलाकारांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना दिल्लीत भेटण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ही भेट घेडून आली.
या आधीही पंतप्रधानांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लग्नाला हजेरी लावली होती.