या देशाच्या पंतप्रधानांनी केली झाकीर नाईकची पाठराखण

या देशाच्या पंतप्रधानांनी केली झाकीर नाईकची पाठराखण

'झाकीरला न्याय मिळणार नसल्यास त्याचं भारताकडे प्रत्यार्पण केलं जाणार नाही.'

  • Share this:

क्वालालंपूर, 10 जून : वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक याच्या बचावासाठी आता खुद्द मलेशियाचे पंतप्रधानच पुढे आलेत. झाकीर नाईकला भारतात न्याय मिळण्याची शक्यता नाही असं वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांनी केल्याचं तिथल्या माध्यमांनी म्हटलं आहे. झाकीरला न्याय मिळणार नसल्यास त्याचं भारताकडे प्रत्यार्पण केलं जाणार नाही असंही महाथीर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना खिळ बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

झाकीर नाईकवर कट्टरतावादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.  धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, भारताविरोधात युद्ध छेडणे, राष्ट्रविरोधी कारवाई करण्यासाठी पैसा वळवणे. अशाप्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आले आहेत. NIAनं एकूण 85 जणांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये झाकीरची सख्खी बहीण नाईला नूरानी यांचाही समावेश आहे.

भारतात आरोप होत असल्याने देशाभार असलेला झाकीर गेल्या पाच वर्षांपासून भारतात परतच आलेला नाही. तो सध्या मलेशियात राहत असून तिथल्या सरकारनेही त्याला संरक्षण दिलंय. धार्मिक शिकवण देण्याच्या नावाखाली तो दहशतवादी विचारांना बळ देतो हा त्याच्यावर मुख्य आरोप आहे.झाकीरची 50 कोटींची संपत्ती जप्त

वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकची 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्त केली आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या झाकीर नाईकच्या संस्थेवर केंद्र सरकारने या अगोदरच पाच वर्षांची बंदी घातली आहे.

गुरुवारी ED ने झाकीरच्या मालमत्तेवर ताबा मिळवला. झाकीर आणि त्याच्या साथिदारांची 196.06 कोटी संपत्ती बेहिशोबी असल्याचं लक्षात आल्यानंतर ED ने कारवाई सुरू केली.

झाकीर नाईक 2016 पासून फरार आहे. तो देश सोडून पळून गेला आहे. सुरुवातीला सौदी अरेबियाच्या आश्रयाला असल्याचं बोललं जात होतं. आता तो मलेशियात शरणार्थी म्हणून राहात असल्याची माहिती आहे.  धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, भारताविरोधात युद्ध छेडणे, राष्ट्रविरोधी कारवाई करण्यासाठी पैसा वळवणे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. NIA या संबंधी तपास करत आहे.

भारताने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी दबाव आणला आहे. इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणायचा भारत प्रयत्न करत आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 09:32 PM IST

ताज्या बातम्या