News18 Lokmat

'दंगल'गर्ल झायरा वसीमशी विमानात असभ्य वर्तन, इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केला व्हिडिओ

दिल्लीहून मुंबईला येताना झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मध्यमवयीन पुरुषानं अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2017 10:15 AM IST

'दंगल'गर्ल झायरा वसीमशी विमानात असभ्य वर्तन, इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केला व्हिडिओ

10 डिसेंबर : दंगल चित्रपटातली अभिनेत्री झायरा वसीमचा विमानात विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडलीये. झायरानं स्वतः पुढे येऊन याबाबत माहिती दिलीये. इंस्टाग्रामवर तिनं दोन व्हिडिओ अपलोड केलेत. दिल्लीहून मुंबईला येताना झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मध्यमवयीन पुरुषानं अश्लील वर्तन करायचा प्रयत्न केला.

तिच्या मानेला आणि पाठीला हात लावण्याचा त्यानं प्रयत्न केला. झायरानं विमानातच व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला. पण तिथे प्रकाश कमी होता. विमानातून उतरल्यावर तिनं आणखी एक व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओत तिला अश्रू अनावर झाले. कुणी असं कसं वागू शकतं.आम्हा मुलींनाच आमचं संरक्षण करावं लागणार आहे. इतर कुणीही पुढे येणार नाहीये, असं ती या व्हिडिओत म्हणालीये.

Loading...

Somebody misbehaved with her in the flight 😤 Strict actions must be taken on this incident 😡 OMG she is Crying 😢 . . . . . . . . #repost #flightattendant #misbehaving #terrible #actions #kashmir #india #indian #fools #live #zaira #zairawasim #bolllywood #video #viral #follow4follow #like4like #airport #fans

A post shared by zaira wasim (@zaira_wasimworld) on

ज्या एअरलाईनमधून झायरा प्रवास करत होती, त्या विस्तारानं निवेदन प्रसिद्ध केलंय.

- झायरा वसीमबाबतचं वृत्त आम्ही बघितलं आहे. आम्ही याचा सविस्तार तपास करत आहोत. झायराला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. असली वर्तणूक अजिबात सहन केली जाणार नाही, हे आमचं धोरण आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...