काश्मीरबद्दल ट्विट केल्यानं नोबेल विजेती मलाला ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

काश्मीरबद्दल ट्विट केल्यानं नोबेल विजेती मलाला ट्रोलर्सच्या निशाण्यावर!

शांततेच्या नोबेल पुरस्कारानं गौरवलेल्या मलालाने काश्मीर मुद्द्यावरून ट्विट केलं होतं. त्यावरून सध्या सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : सर्वात कमी वयात शांततेचं नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या युसुफजई मलाला आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिनं काश्मीरवरून केलेल्या टि्वटनंतर अनेकांनी मलालाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थिती केला आहे. मलालाने म्हटलं होतं की, काश्मीरमधील मुली शाळेला जाऊ शकत नाहीत यामुळं आपण निराश आहे. काश्मीरमधील परिस्थितीमुळे तीन मुलींनी शाळेतील परीक्षेला मुकल्याचं आपल्याला सांगितलं असा दावाही मलालाने केला आहे.

मलालाच्या ट्विटनंतर अनेकांनी सुनावलं आहे. भारताची नेमबाजपटू हिना सिद्धू भडकली असून तिनं तुला एवढचं काही करायचं असेल तर पहिल्यांदा पाकिस्तानला जाऊन दाखव असं म्हटलं आहे. स्वत:चा देश सोडून गेल्यावर परत देशात आली नाहीस असं हिनाने म्हटलं आहे.

हिना सिद्धुने पाकिस्तानात कशा प्रकारे शाळेत गेल्यावर तालिबान्यांनी हल्ला केला याची आठवण करून देताना मलालाने शिक्षणासाठी संघर्ष करताना प्राणही गमावला असता पण दुसऱ्या देशात निघून गेली. तिथेच राहणाऱ्या मलालाने पहिल्यांदा पाकिस्तानला जाऊन दाखवावं असं ट्विट हिनाने केलं आहे.

कर्नाटकच्या खासदार शोभा करंदालजे यांनीही मलालाच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, नोबेल विजेत्या मलाला हिला विनंती आहे की तिने पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचाही विचार करावा. त्यांना पाकिस्तानात धर्मांतर, छळ सहन करावा लागत आहे. काश्मीरमध्ये लोकांचा आवाज दाबला जात नाही तर विकासासाठी पुढे वाटचाल सुरू आहे.

मलालानं संयुक्त राष्ट्रसंघाकडे मागणी केली होती की, काश्मीरमध्ये शाळा सुरू होण्यासाठी मदत करावी. तसेच काश्मीरमध्ये शांतता निर्माण यावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पुढं यावं आणि तिथल्या लोकांच्या समस्लाय सोडवाव्या. अनेक काश्मीरींनी नाराजी व्यक्त केली आहे असंही ती म्हणाली होती.

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्टला सुरक्षेच्या कारणास्तव संचारबंदी लागू करण्यात आली होती. सध्या परिस्थिती सुधारली असून हळू हळू बंदी हटवली जात आहे. काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

पाकच्या कुरापतीचा VIDEO; जवानांनी असं वाचवलं नागरिकांना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: malala
First Published: Sep 16, 2019 11:03 AM IST

ताज्या बातम्या