मोजोसचा पार्टनर युग तुली हैदराबादमध्ये, विमानतळावरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

मोजोसचा पार्टनर युग तुली हैदराबादमध्ये, विमानतळावरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद

एकीकडे, कमलामिल आगीप्रकरणी आरोपी आणि मोजोस बिस्त्रोचा पार्टनर युग तुलीला मुंबई पोलीस शोधतंय तर दुसरीकडे युग तुली हैद्राबादमध्ये असल्याची माध्यमांची माहिती आहे.

  • Share this:

10 जानेवारी : एकीकडे, कमलामिल आगीप्रकरणी आरोपी आणि मोजोस बिस्त्रोचा पार्टनर युग तुलीला मुंबई पोलीस शोधतंय तर दुसरीकडे युग तुली हैद्राबादमध्ये असल्याची माध्यमांची माहिती आहे.एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्ताप्रमाणे सोमवारी सकाळी युग तुली हैद्राबाद विमानतळावर त्याच्या पत्नीसमवेत सीसीटीव्ही फुटेजमधे दिसला.

युग तुली विमानतळावर असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिस त्याच्या मागावर लागले. मात्र नंतर असं कळलं की युग तुली विमातळावरून गायब झाला. शनिवारी 6 जानेवारीला मुंबई पोलिसांनी युग तुलीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आणि तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहेत.

काल भोईवाडा कोर्टानं त्याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला. त्यामुळे त्याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

कोण आहे युग तुली ?

- 'मोजोस बिस्त्रो'मधला भागीदार

- तुली हॉस्पिटॅलिटीचा संचालक

- वय - 29 वर्षं

- स्वित्झर्लंडमधून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण

- स्वित्झर्लंडमध्ये डीजे म्हणूनही काम केलं

- तुली परिवार नागपूरस्थित

- उद्योजक प्रिन्स तुलीचा पुतण्या

- तुली परिवार हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातलं बडं प्रस्थ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 11:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading