Home /News /national /

टोल नाक्यावर गाडी अडवली म्हणून मारली थोबाडीत, पाहा महिला नेत्याच्या दादागिरीचा VIDEO

टोल नाक्यावर गाडी अडवली म्हणून मारली थोबाडीत, पाहा महिला नेत्याच्या दादागिरीचा VIDEO

महिला नेता डी. रेवती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांनी सर्व आरोप खोडून काढले असून कामगारानं गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे.

    अमरावती, 10 डिसेंबर : टोल कर्मचाऱ्यांसोबत गुंडगिरीसारखी वागणूक दिली जाण्याच्या घटना काही नवीन नाहीत मात्र महिला नेत्यानं एका टोल कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. टोल नाक्यावर गा़डी अडवली म्हणून बॅरिकेट्स हटवून महिला नेत्यानं रागाच्या भरात कर्मचाऱ्याचा कानशिलात लगावली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. टोल कामगारांवर नेत्यांच्या नाराजीच्या किस्से बर्‍याचदा उघडकीस येत असतात. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या वायएसआर काँग्रेसच्या (YSR काँग्रेस) महिला नेत्याच्या कथित 'दादागिरी' चा एक व्हिडिओ समोर आला आहे. टोल नाक्यावर गाडी थांबवून चिडलेल्या डी. रेवती यांनी कामगारांच्या कानशिलात लगावली. टोल टॅक्स विचारल्यानंतर महिला नेत्याचा संताप अनावर झाला आणि हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातून समोर आला आहे. हे वाचा-इंटरपोलच्या इशाऱ्यानंतरही फायझर कंपनीच्या डेटावर सायबर हल्ला YSRCP नेता डी. रेवती यांनी टोल नाक्यावरील कामगारावर संताप काढला. ANI न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार कामगारावर केवळ हात उचलला नाही तर अर्वाच्च भाषेत देखील बोलल्या आहेत. लावलेले बॅरिकेट काढून टाकले आणि गाडी घेऊन निघून गेल्या. एक मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये पाहिलं तर गाडीतून स्वत: महिला नेत्या उतरून आधी कामागारवर चिडतात आणि संतापाच्या भरात थोबाडीत मारतात इतकच नाही तर बॅरिकेट्स उचलून बाजूला देखील करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी व्हिडीओच्या आधारे पोलिसात महिला नेता डी. रेवती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांनी सर्व आरोप खोडून काढले असून कामगारानं गैरवर्तन केल्याचा आरोप लावला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Andhra pradesh, Congress, Viral video.

    पुढील बातम्या