भर दिवसा एअरपोर्टवर झाला चाकू हल्ला; VSR काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी जखमी

भर दिवसा एअरपोर्टवर झाला चाकू हल्ला; VSR काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी जखमी

YSR काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर आज विशाखापट्टणमच्या विमानतळावर हल्ला करण्यात आला. एअरपोर्ट कँटीनमध्ये काम करणाऱ्या वेटरनं धारदार शस्त्रानं हा हल्ला केल्याचं समजतंय. रेड्डी यांच्या डाव्या हाताला जखम झाली आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), २५ ऑक्टोबर: वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाला. विशाखापट्टणमच्या विमानतळावर एका वेटरनं हा हल्ला केला. एअरपोर्ट कँटीनचा वेटर असलेल्या या इसमानं जगनमोहन रेड्डींना चहा दिला आणि राज्यातल्या राजकीय परिस्थितीविषय काहीतरी विचारलं. अचानक त्यानं धारदार शस्त्रानं त्यांच्या खांद्यावर वार केला. विमानतळारच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीनं रेड्डींना बाजूला केलं आणि हल्लेखोराला ताब्यात घेतलं.

रेड्डी यांच्या खांद्याजवळ हाताला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवास नावाचा हा हल्लेखोर एअरपोर्ट कँटीनमध्ये वेटर म्हणून का करतो. त्यानं हा हल्ला का केला याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही.

VIDEO: पत्नीच्या जागेवर स्टॉल लावला म्हणून शिवसैनिकांनी उत्तर भारतीयाला धुतलं

First published: October 25, 2018, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading