एक तासासाठी बंद झालेली YOUTUBE सेवा पुन्हा सुरू...

एक तासासाठी बंद झालेली YOUTUBE सेवा पुन्हा सुरू...

सर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरातली यू ट्यूबची सेवा झाली होती ठप्प...

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : आज सकाळी साडे सहा ते साडे सात दरम्यान तब्बल एक तास जगभरातली यू ट्यूबची सेवा ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाडामुळं सेवेवर परिणाम झाल्यामुळं यू ट्यूबचा सर्व्हर डाऊन झाला होता. या बिघाडाला यू ट्यूब कंपनीनं दुजोरा दिला. त्यामुळं कोणताही व्हिडिओ प्ले होण्यात अडचण निर्माण होत होत्या. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. पण एकच तासात सेवा पूर्ववत झाली.

डेक्सटॉपपासून ते अॅपपर्यंत व्हिडिओ प्ले होण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे अनेक यूजर्स त्रस्त झाले होते. यामध्ये यूजर्सना 500 आणि 503 अंतर्गत सर्व्हर Error messages दिसत होता. ज्यामध्ये व्हिडिओवर फक्त Thumbnail दिसत होता.

या समस्येमुळे वापरकर्त्यांना कोणताही व्हिडिओ पाहता येत नव्हतं. तथापि, कंपनीने ट्विट करून या समस्येवर काम करत असल्याचं सांगितलं होतं.

 

सुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 08:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading