चंदिगढ, 26 नोव्हेंबर: लग्नात सासरच्या मंडळींकडून मिळत असलेला 11 लाख रुपयांचा हुंडा नाकारून (Youth set example by denying dowry at marriage) एका तरुणाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हुंडा घेणं हा (Accepting dowry in legal crime) कायद्यानं गुन्हा आहे. मात्रही अनेक ठिकाणी ही अघोरी प्रथा सुरु असल्याचं दिसतं. काही ठिकाणी तर हुंडा घेणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. अशा परिस्थितीत (Youth set example) स्वतःच्या वर्तनातून समाजापुढं नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे.
हुंड्याला दिला नकार
हरियाणातील करनालमध्ये प्राध्यापक असणाऱ्या विक्रम सिंह नावाच्या तरुणाने आपल्या लग्नात हुंडा न घेण्याचा निर्णय घेतला. कळत्या वयातच त्याने हा निर्णय मनाशी पक्का केला होता. काहीही झालं तरी लग्नात हुंडा न घेऊन समाजात चांगला संदेश देण्याचा त्याचा मनोदय होता. त्यामुळेच प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी त्याने हुंडा घ्यायला नकार दिला आणि त्याच्या या निर्णयाचं त्याच्या घरच्यांना आणि सासरच्यांना कौतुक वाटलं.
पत्नीचं प्रेम झालं द्विगुणित
आपल्याला हुंडा देण्यासाठी सासरच्या मंडळींना कर्ज घ्यावं लागणार होतं. हुंड्यामुळे मुलींवर अन्याय, अत्याचार होत असल्याच्या घटना आपण नेहमी आजूबाजूला पाहतो. हुंड्यामुळेच अनेक पालकांना मुली जड वाटू लागतात. हे बदलण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करायचं तरुणानं ठरवलं आणि लग्नमंडपात हा निर्णय जाहीर केला. मुलीच्या घरच्यांना दुःख देऊन, कर्जबाजारी करून आपण आनंदी होऊच शकत नाही, असं तो म्हणाला आणि ते ऐकून होणाऱ्या पत्नीच्या नजरेत त्याचा आदर कमालीचा वाढला.
हे वाचा - इस्रायलमध्ये सापडला नव्या धोकादायक व्हेरिएंटचा पहिला रुग्ण
परिसरात होतंय कौतुक
विक्रमच्या या निर्णयाचं परिसरात कौतुक होत आहे. विक्रम हा प्राध्यापक असल्यामुळे त्याने त्याच्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक विद्यार्थी भविष्यात हुंडा नाकारतील, अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.