वडिलांनी जग्वार घेऊन दिली नाही म्हणून ओढयात ढकलून दिली BMW कार!

वडिलांनी जग्वार घेऊन दिली नाही म्हणून ओढयात ढकलून दिली BMW कार!

'बडे बाप का बेटा'काय करेल याचा काही नेम नाही. हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये एका तरुणाने त्याची BMW कार नदीत ढकलून दिली. कारण काय तर त्याच्या वडिलांनी त्याला जग्वार कार घेऊन द्यायला नकार दिला !

  • Share this:

यमुनानगर (हरियाणा), 9 ऑगस्ट : 'बडे बाप का बेटा'काय करेल याचा काही नेम नाही. हरियाणामधल्या यमुनानगरमध्ये एका तरुणाने त्याची BMW कार नदीत ढकलून दिली. कारण काय तर त्याच्या वडिलांनी त्याला जग्वार कार घेऊन द्यायला नकार दिला !

यामुळे चिडलेल्या तरुणाने त्याची महागडी BMW कार पाण्यात ढकलून दिली. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ही कार पाण्यात लांबवर वाहत जाऊन अडकली. मग ती बाहेर काढण्यासाठी खटाटोप करावा लागला. आता पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत.

पंजाब आणि हरियाणामध्ये तरुणांमध्ये महागड्या कारची खूपच क्रेझ आहे. या महागड्या गाड्यांबद्दल या राज्यात गाणीही बनत आहेत. या प्रलोभनांना बळी पडून तरुण आपला गाड्यांचा शौक पुरा करण्यासाठी आईवडिलांना हैराण करतात. यमुनानगरमध्येही असंच उदाहरण पाहायला मिळालं.

जग्वार गाडीची किंमत 40 ते 50 लाखांपासून सुरू होते. काही महागड्या गाड्यांची किंमत तर कोट्यवधींच्या घरात आहेत. पंजाब- हरियाणामध्ये गावागावांत अशा महागड्या गाड्या पाहायला मिळतात. अशा गाड्या घेऊन मित्रमंडळींमध्ये मिरवण्याचा नादच इथल्या तरुणांना जडलाय.

या तरुणाने ज्या जग्वार कारसाठी BMW कार पाण्यात ढकलून दिली ती गाडीही तेवढीच महागडी आहे. या गाडीसाठी 30 ते 35 लाख रुपये मोजावे लागतात. या सगळ्या लक्झरी कार आहेत. वडिलांनी या तरुणाला BMW कार घेऊन दिली हीच काही छोटी गोष्ट नव्हती आणि जग्वार कारसाठी त्याने BMW कार पाण्यात घातली.

=======================================================================================================

माय लेकराला भांड्यात बसवून तरुणांनी वाचवलं, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: August 9, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading