व्हिडिओ : दिग्विजयसिंहांच्या सभेत मोदींचं गुणगान!

कुणाकुणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले ? असा प्रश्न दिग्विजयसिंह यांनी त्यांच्या सभेत विचारला. त्यावर एक तरुण पुढे आला आणि त्याने मोदींचं गुणगान करायला सुरुवात केली.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 09:03 PM IST

व्हिडिओ : दिग्विजयसिंहांच्या सभेत मोदींचं गुणगान!

भोपाळ, 22 एप्रिल : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमधली निवडणूक सध्या खूपच गाजते आहे. भाजपने इथून साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिल्याने दिग्विजयसिंह यांच्यापुढे आव्हान उभं राहिलं आहे. त्यातच दिग्विजयसिंह यांच्या प्रचारसभेचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

15 लाख रुपये कुणाच्या खात्यात ?

नरेंद्र मोदींवर टीका करताना, कुणाकुणाच्या खात्यात 15 लाख रुपये आले ? असा प्रश्न दिग्विजयसिंह यांनी त्यांच्या सभेत विचारला. यावर दिग्विजयसिंह यांना सगळ्यांकडून 'नाही' असंच उत्तर अपेक्षित होतं. त्यावर एक तरुण त्यांच्या प्रश्नाला होकार देत पुढे आला. दिग्विजय सिंह यांनी त्याला मुद्दाम मंचावर बोलवलं. हा तरुण दिग्विजय सिंह यांच्या स्टेजवर गेला. त्यांनी त्याच्यापुढे माईक धरला तर त्याने मोदींचं गुणगान करायला सुरुवात केली.Loading...

या तरुणाने एअर स्ट्राइकचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. हे ऐकून दिग्विजयसिंह संतापले आणि त्यांनी या तरुणाला धक्के मारून खाली उतरवलं. दिग्विजयसिंह मोदींवर टीका करायला गेले खरे आणि या तरुणामुळे त्यांचीच फजिती झाली.

तरुणानेच उडवली दांडी

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले दिग्विजयसिंह त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रसिद्ध आहेत. पण इथे मात्र या तरुणानेच त्यांची दांडी उडवली, अशी चर्चा आहे. 2 कोटी रोजगार आणि खात्यात 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं, असं म्हणत काँग्रसने भाजपवर टीका केली आहे. यावरून भोपाळमध्येच नव्हे तर देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.

================================================================================

VIDEO : शाहरुखचं मतदानासाठी रॅपसाँग, म्हणतो...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...