नियम पाळायलाच हवेत! हेल्मेट घालून केला गरबा डान्स, पाहा VIDEO

नियम पाळायलाच हवेत! हेल्मेट घालून केला गरबा डान्स, पाहा VIDEO

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या रकमेच्या दंडाची कारवाई होऊ शकते.

  • Share this:

सुरत, 30 सप्टेंबर : सध्या सगळीकडे नवरात्रीची धूम सुरू आहे. अनेक ठिकाणी दांडियाचे आयोजन केलं जात आहे. गुजरातमधील गरबा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये डान्स करताना लोकांनी हेल्मेट घातले होते. लोकांमध्ये रस्ते वाहतुक सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हेल्मेट घालून डान्स करण्याचा उद्देश जनजागृती हा होताच पण त्याचसोबत जे लोक हेल्मेट घालतात त्यांना प्रोत्साहन देणं हा सुद्धा होता.

सूरतमध्ये अनोख्या अशा अंदाजात गरबा नृत्य करताना लोक दिसले. हेल्मेट घालून तरुणाई गरबा खेळत होती. ग्रुपमधील एकाने सांगितलं की, हेल्मेट घालणं आणि सीटबेल्ट लावणं सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे. नियमांचे पालन करायला हवं. सरकारने सक्ती करून काहीही फायदा नाही. लोकांनी स्वत:ला सवय लावून घेतली पाहिजे.

टार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हा कायदाबदल आहे. पात्रता नसतानाही गाडी चालवणाऱ्यांना इतके दिवस 500 रुपये दंड होत होता. तोच आता 10 हजार रुपये झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात होता. तोही आता 10000 रुपयांवर गेला आहे. लायसन्स बरोबर नसेल तर 500 ऐवजी आता 5000 रुपये दंड द्यावा लागेल. त्यामुळे गाडी चालवताना बरीच खबरदारी घ्यावी लागणार आहे.

वाचा : हेल्मेट घातलं नाही ही बस चालकाची चूक? ट्राफिक पोलिसांनी फाडली पावती

वाचा : दंड कसा करायचा? हेल्मेट नाही म्हणून अडवलं पण पोलिसांनाच पडला प्रश्न

तरुणाचं ट्राफिक पोलिसांना आव्हान, आधी माझी गाडी चालवा नंतर पावती फाडा!

Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: traffic
First Published: Sep 30, 2019 02:03 PM IST

ताज्या बातम्या