तिरुवनंतरपुरम, 2 नोव्हेंबर: आपण कसे महिलांशी (Youth from Kerala brags about groping women) लगट करायचो आणि मित्रांसोबत स्पर्धा लावून Boob Hunting करायचो, या गोष्टी अभिमानाने मिरवणाऱ्या तरुणावर सध्या देशभरातल्या महिलांकडून जोरदार टीका होत आहे. केरळमधील या तरुणानं सोशल मीडियावर याबाबत निर्लज्जपणे पोस्ट (Social media post about boob hunting) करत आपल्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे. मात्र यामुळे महिलांशी लगट करून, गर्दीचा फायदा घेत लैंगिक चाळे करणाऱ्या मनोवृत्ती किती फोफावल्या आहेत, याचीच प्रचिती येत असल्याचं दिसून येत आहे.
This was shared on Instagram yesterday. Do read. And remain aware.
Some of the ‘accidental’ groping us women go through isn’t accidental at all. We are part of some sort of a competition for *some* of these guys who brag about it. 1/2 pic.twitter.com/4twO6Z73dM — Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 31, 2021
काय आहे प्रकरण
केरळमधील एका तरुणानं आपण वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच महिलांशी लगट करणे, त्यांच्या बुब्सना स्पर्श करणे, गर्दीचा फायदा घेत लैंगिक चाळे करणे, महिलांना स्पर्श करणे असे प्रकार करत असल्याचं सोशल मीडियावरून जाहीर केलं आहे. जणू काही आपण एखादं थोर काम करत असल्याच्या अविर्भावात त्याने केलेल्या या पोस्टचा देशातील तमाम महिलांनी आणि पुरुषांनीदेखील समाचार घेतला आहे.
विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेत असलेला हा तरुण आपल्या मित्रांसोबत केलेले विकृत लैंगिक चाळे अभिमानाने मिरवत असल्याबद्दल अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली असून त्याच्या आईने जरा अधिक लक्ष द्यायला हवे होते, अशी सूचना केली आहे.
This was shared on Instagram yesterday. Do read. And remain aware.
Some of the ‘accidental’ groping us women go through isn’t accidental at all. We are part of some sort of a competition for *some* of these guys who brag about it. 1/2 pic.twitter.com/4twO6Z73dM — Chinmayi Sripaada (@Chinmayi) October 31, 2021
प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी या विकृत इन्स्टाग्राम पोस्टचा समाचार घेतला आहे. महिलांशी होणारी लगट आणि स्पर्श हे अनेकदा अपघात आहेत, असं वाटतं. पण ही पोस्ट पाहून ते अपघात नसतात, याची जाणीव होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
300 पेक्षा अधिक महिलांचं बुब हंटिंग ही त्याच्यासाठी करमणुकीची बाब होती, मात्र त्याचवेळी त्या महिलांच्या आयुष्यात कधीही न विसरता येणारी मानसिक जखम करत असल्याची जाणीवही त्याला नसावी, हे दुर्दैव असल्याचं त्या म्हणतात. आपल्या मुलांना वाढवताना काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला आहे.
हे वाचा- लेकीच्या हत्येसाठी बापाला डांबलं तुरुंगात, 3 वर्षांनी मुलगीच आली समोर
मजा आणि स्पर्धा
महिलांची छेड काढणं आणि बुब हंटिंगमध्ये कुणाचा किती स्कोअर झाला, याची स्पर्धा लावणं या गोष्टी विकृतीचा कळस असून त्या निर्जल्लपणे मिरवणाऱ्यांवर पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल काही नेटिझन्सनी उपस्थित केला आहे. तर जी घटना महिलेच्या आयुष्यावर कायमस्वरुपी ओरखडा उठवणारी ठरते, त्या गोष्टी मजेसाठी आणि बढाया मारण्यासाठी करण्याची विकृती कशी ठेचावी, ही चिंताही अऩेकांनी व्यक्त केली आहे.
ही विकृत पोस्ट सध्या देशभर व्हायरल होत असून पोलीस त्यावर काय कारवाई करतात, याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. अशा नराधमांना वेळीच कायदेशीर शिक्षा झाली, तरच अशा विकृतींना आळा बसेल, अशी सामान्यांची भावना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.