Home /News /national /

दिल्लीतील 'या' तरुणाचा 2 वर्षांत 1 लाख किमी बाईकवरून प्रवास; Online Work करुन भागवतो खर्च

दिल्लीतील 'या' तरुणाचा 2 वर्षांत 1 लाख किमी बाईकवरून प्रवास; Online Work करुन भागवतो खर्च

या कालावधीत तो आपला खर्च भागवण्यासाठी ऑनलाईन काम (Online Work) देखील करतो.

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर : सामाजिक जागरूकता (Social Awareness) म्हणून अनेकजण विविध प्रकारे जनजागृती करत असतात. यासाठी कुणी पायी यात्रा करतात. तर कुणी सायकल आणि मोटारसायकलवरून विविध प्रदेशात जाऊन आपलं काम करत असतात. अशाच पद्धतीनं दिल्लीमधील (Delhi) एक तरुण देखील आपल्या बाईकवरून देशभरात जनजागृती करत फिरत आहे. अंश (Ansh) असं या तरुणाचं नाव असून यासाठी त्याने आतापर्यंत 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. मागील 2 वर्षात त्याने हा प्रवास केला असून भारतातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. आतापर्यंत त्याने उत्तर प्रदेश (Uttar Prdesh) आणि दिल्लीमधील (Delhi) सर्व भाग पालथा घातला आहे. सध्या तो उत्तराखंडमधील शेवटच्या टप्प्यात असून पुढे तो हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) जाणार आहे. 2 ऑक्टोबर 2018 ला त्याने आपली ही मोहीम सुरु केली आहे. मागील 2 वर्षात अनेक संकटांचा सामना करत त्याने आपला हा अविरत प्रवास सुरु ठेवला आहे. या मोहिमेत तो हेल्मेट(Helmet) आणि वाहतुकीच्या नियमांसंबंधी जनजागृती करत असून वाहतुकीच्या नियमांचे महत्व समजावून सांगत आहे. या काळात त्याने डोंगराळ प्रदेशातून तसंच पठारी प्रदेशातून देखील प्रवास केला असून वाहतुकीच्या नियमांचं (Traffic Rules) महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी 100 टक्के वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर ते आपला जीव वाचवू शकतील त्याचबरोबर दुसऱ्यांचा देखील जीव वाचवू शकतील असं तो म्हणतो. भारतात वाहतुकीच्या नियमाचं पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यामुळं भारतातील अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी तो ही जनजागृती मोहीम करत आहे. दरम्यान, या कालावधीत तो आपला खर्च भागवण्यासाठी ऑनलाईन काम (Online Work) देखील करतो. त्याचबरोबर भारतातील प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचं त्याच उद्दिष्ट आहे. ज्या भागाला तो भेट देतो त्याठिकाणी तो नागरिकांना एकत्र आणण्याचं काम करतो. यामध्ये भविष्यातील जनजागृती मोहिमांमध्ये त्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळं अशा या ध्येयवेड्या नागरिकांमुळं भारताचं भविष्य उज्ज्वल असून त्याच्या या प्रेरणादायी कामामधून अनेक तरुणांना देखील प्रेरणा मिळणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या