बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारला म्हणून तरुणाला केली अटक

बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारला म्हणून तरुणाला केली अटक

या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजतो आहे. मोदी सरकारने किती रोजगार दिले याबद्दलच्या आकडेवारीवरही प्रश्न विचारले गेले. पण एका तरुणाने मंत्र्यांना बेरोजगारीबदद्ल प्रश्न विचारला म्हणून त्याला अटक करण्याचाच प्रकार घडला.

  • Share this:

पणजी, 19 एप्रिल : या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा गाजतो आहे. मोदी सरकारने किती रोजगार दिले याबद्दलच्या आकडेवारीवरही प्रश्न विचारले गेले. पण एका तरुणाने मंत्र्यांना बेरोजगारीबदद्ल प्रश्न विचारला म्हणून त्याला अटक करण्याचाच प्रकार घडला.

उत्तर गोव्याच्या वालपोयी मतदारसंघात ही घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे इथले उमेदवार श्रीपाद नाईक यांची प्रचारमोहीम कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक भरवण्यात आली होती.

या बैठकीत दर्शन गावकर या तरुणाने गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना प्रश्न विचारला. मला अनेक वर्षं आश्वासन देऊनही नोकरी का देण्यात आली नाही, असं त्याने विचारलं होतं. पण यावर उत्तर द्यायचं सोडून ही बैठक संपल्यावर मला अटक करण्यात आली, असं दर्शन गावकर याने पत्रकारांना सांगितलं.

जामिनावर सुटका

या तरुणाला अटक करून मग जामिनावर सोडून देण्यात आलं. या घटनेवर विश्वजीत राणे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण दर्शन गावकर याने चुकीच्या पद्धतीने हा प्रश्न विचारला. त्याने असा प्रश्न विचारण्यामागे विरोधकांचा डाव आहे, असं ते म्हणाले. कुणीतरी त्याच्याविरुद्ध तक्रार केली असेल म्हणूनच त्याला अटक करण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं.

या अटक प्रकरणाचा काँग्रेसने निषेध केला आहे. भाजप आपल्या सत्तेचा गैरवापर करतंय, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. भाजपचे नेते उद्वेगाने कुणावरही राग काढत आहेत,अशी टिप्पणी काँग्रेसचे प्रवक्ते ट्रँजॅनो डिमेलो यांनी केली आहे.

दर्शन गावकर याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती पण या अटकेसाठी नेमकं काय कारण होतं याबद्दल कुठलंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

==================================================================================

VIDEO : शिवबंधनात अडकल्यानंतर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या