...आता व्होटर कार्ड आधारशी लिंक होणार, निवडणूक आयोग सज्ज

...आता व्होटर कार्ड आधारशी लिंक होणार, निवडणूक आयोग सज्ज

व्होटिंग कार्ड आधारशी जोडण्यासाठी काही शर्ती आणि आटीसह पुढे जाण्याच्या सुचना केंद्रीय कायदा मंत्रालयानं दिल्या आहेत. कायदा मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला व्होटिंग कार्डसोबत आधार कार्ड लिंग करण्याचा अधिकार मिळण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी: आता लवकरच तुमचं व्होटिंग कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक केलं जाणार आहे. कारण व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याला केंद्रीय कायदा मंत्रालयानं मंजुरी दिल्याची माहिती मिळतेय.त्यामुळं निवडणूक आयोगानं व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची सुचना केंद्रीय कायदे मंत्रालयाला केली होती. निवडणूक आयोगाची सुचना केंद्रीय कायदा मंत्रालयान मान्य केली आहे. मात्र या प्रक्रियेत कोणत्याही नागरिकांची खासगी माहिती चोरी होणार नाही याची व्यवस्था करणं गरजेचं आहे.कोणत्याही नागरिकांची माहिती सुरक्षित राहण्याची व्यवस्था असावी असंही कायदा मंत्रालयानं सांगितलं आहे. त्यामुळं व्होटिंग कार्ड आधार कार्डशी जोडताना काही शर्ती आणि अटी घालण्यात आल्या आहे. त्यामुळं व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा कायदेशीर अधिकार निवडणूक आयोगाला मिळण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2015 साली निवडणूक आयोगानं आधार कार्ड निवडणूक मतदान फोटो आयडीशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तेव्हापासूनचं व्होटिंग आयडी कार्ड आधार कार्डशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. त्यावेळी एच.एस. ब्रह्मा मुख्य निवडणूक आयुक्त होते.

व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र सुप्रिम कोर्टनं त्यावर बंदी घातली होती. कारण कॅरोसीन आणि एलपीजी देण्यासाठी आधार कार्डचा वापर करण्यास सुप्रीम कोर्टानं बंदी घातली होती. त्यामुळं निवडणूक आयोगानं आधार कार्डशी व्होटिंग कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया थांबवली होती. मात्र त्या आधीच निवडणूक आयोगानं 38 कोटी व्होटिंग कार्ड आधारशी लिंक केले होते.

ऑगस्ट 2019 साली निवडणूक आयोगानं कायदे मंत्रालयातील सचिवांना पत्र लिहून लोकप्रतिनिधी कायदा 1950 आणि आधार अधिनियम कायदा 2016 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. कायद्यातील दुरुस्तीमुळं व्होटिंग कार्डमधील माहिती गुपित राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळं लोकप्रतिनीधी कायद्यातील दुरुस्तीमुळं निवडणूक मतदान अधिकारी मतदातांकडे मतदान यादीत नाव नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड मांगू शकतात.

First published: January 24, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या