काय होती खोटी बातमी? ‘रेशन कार्ड तीन महिन्यांनी रद्द होणार’ असं वृत्त काही माध्यमांनी बुधवारी प्रसिद्ध केल्यानं खळबळ उडाली होती. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) या योजनेनुसार तीन महिने कोणतीही धान्य खरेदी केली नाही तर कार्ड रद्द होणार आहे. आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, केरळ, तेंलगणा, त्रिपूरा आणि उत्तर प्रदेश या नऊ राज्यांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली आहे,’ असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला होता. कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus pandemic) काळात कोणत्याही व्यक्तीचा भूकबळी जावू नये म्हणून केंद्र सरकारनं मे 2020 मध्ये ‘वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरु केली. त्यानंतर लगेच पुढच्या महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. सध्या 23 राज्यातील 87 कोटी नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मार्च 2021 पर्यंत संपूर्ण देशात ही योजना लागू करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.कुछ मीडिया रिपोर्ट्स में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार ने राज्य सरकारों को निर्देश जारी किए हैं कि तीन महीने तक राशन नहीं लिए जाने की स्थिति में राशन कार्ड रद्द किया जा सकता है। #PIBFactCheck:- यह दावा फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसे कोई दिशा-निर्देश नहीं दिए हैं। pic.twitter.com/2ujrspote2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 18, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ration card