तुमचे नाव बदलून जाईल पण हैदराबादचे नाही, ओवेसींचा पलटवार

तुमचे नाव बदलून जाईल पण हैदराबादचे नाही, ओवेसींचा पलटवार

'भाजपचे नेते इथं राहणाऱ्या लोकांना पाकिस्तानी आणि अफगानिस्तानी रोहिंग्या ठरवत आहे. काही नेते हैदराबादचे नाव बदलण्याची भाषा करत आहे'

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : हैदराबाद महापालिका (Hyderabad Municipal Elections)निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adiyanath)  यांनी हैदराबादचे (Hyderabad) नाव बदलण्याचे भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानामुळे एमआयएमचे (AIMIM) खासदार असदुद्दीन ओवेसी चांगलेच भडकले आहे. हैदराबादचे नाव बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, असा पलटवार ओवेसींनी केला आहे.

ओवेसी यांनी जाहीर सभेत योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार पलटवार केला आहे. 'भाजपचे नेते इथं राहणाऱ्या लोकांना पाकिस्तानी आणि अफगानिस्तानी रोहिंग्या ठरवत आहे. काही नेते हैदराबादचे नाव बदलण्याची भाषा करत आहे. पण तुमचे नाव बदलून जाईल, पण हैदराबादचे नाव बदलणार नाही' अशी टीका ओवेसींनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथं येऊन हैदराबादचे नाव बदलण्याचे बोलत आहे. त्यांनी या नावाचा काय कंत्राट घेतले आहे. जर या लोकांना उद्या ताजमहल कुणी बनवला असं विचारलं तर ही लोकं मुगल बादशाहने नाही बनवले असं सांगायला मागे पुढे पाहणार नाही, असा टोलाही ओवेसींनी लगावला.

'भाजपचे जितके नेते आहे, हे हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्याचे बोलत आहे, पण इथली जनताच त्यांना उत्तर देईल, असंही ओवेसी म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: November 29, 2020, 10:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading