73 वर्षीय भिकाऱ्याने साईबाबा मंदिराला दिलं इतकं दान, पाहून तुमचे डोळे फिरतील

73 वर्षीय भिकाऱ्याने साईबाबा मंदिराला दिलं इतकं दान, पाहून तुमचे डोळे फिरतील

या भिकाऱ्याने गेल्या 7 वर्षांपासून मंदिराबाहेर हात पसरून भीक मागत जमा केलेली रक्कम मंदिराला दान केली आहे

  • Share this:

विजयवाडा, 14 फेब्रुवारी : आंध्र प्रदेशातील विजयवाडामधील एका 73 वर्षीय भिकाऱ्याने साईबाबा मंदिराला इतकी मोठी रक्कम दान केली आहे की ते वाचून तुमचे डोळेच फिरतील. या भिकाऱ्याने एक किंवा दोन नाही तर तब्बल 8 लाखांचं दान दिलंय. यादी रेड्डी असं या भिकाऱ्याचं नाव आहे. गेल्या 7 वर्षांपासून मंदिराबाहेर हात पसरून भीक मागत जमा केलेली 8 लाखांची रक्कम या भिकाऱ्याने साईबाबा मंदिराला दान केलीय. या व्यक्तीने 40 वर्षे हातगाडी ओढण्याचं काम केलं. त्यानंतर एका अपघातात पाय गमावल्याने भीक मागण्यास सुरूवात केली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भिकाऱ्याने सुरूवातीला साई मंदिराला एक लाखांचं दान मंदिराला दिलं होतं. मात्र प्रकृती खालावत गेल्यानंतर आपला सगळा पैसा मंदिराला दान करण्याचा निर्णय रेड्डी यांनी घेतल्याचं सांगितलं. तसंच मंदिराला दान देत राहिल्यामुळे आपल्याकडील पैसा वाढत गेल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं.

मंदिराला दान दिल्यानंतर लोक मला ओळखू लागले, असं रेड्डी सांगतात. तसंच माझा पैसाही वाढत गेल्याचं त्यांनी म्हटलंय. आतापर्यंत 8 लाखांचं दान रेड्डी यांनी साईमंदिराला केलंय, तसंच यापुढेही आपली सगळी कमाई मंदिराला देणार असल्याचं रेड्डींनी म्हटलंय..त्यांच्या दानामुळे मंदिराच्या विकासाला मदत होणार असल्याचंही मंदिर प्रशासनानं म्हटलंय. रेडडी यांच्या मदतीने गोशाळा बांधणार असल्याचंही मंदिर प्रशासनाने म्हटलंय. त्यांनी मंदिराला दिलेल्या दानाचा आम्ही सन्मान करतो. आम्ही कोणत्याही प्रकारचं दान स्वीकारत नाही मात्र लोक स्वेच्छेने दान करत असल्याचं मंदिर प्रशासनाने म्हटलंय

अन्य बातम्या

अखेर पुण्यातील सविताभाभी होर्डिंग्सचं गुढं उलगडलं...पाहा व्हिडिओ

मेट्रोही महिलांसाठी असुरक्षित, तरुणाने भर मेट्रोत काढली पॅन्ट आणि...

First published: February 14, 2020, 1:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading