Home /News /national /

'लवकरच तुमचे वाईट दिवस येतील',राज्यसभेत जया बच्चन भाजपवर संतापल्या

'लवकरच तुमचे वाईट दिवस येतील',राज्यसभेत जया बच्चन भाजपवर संतापल्या

मी तुम्हाला लोकांचे आभार मानते, वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही आम्हा लोकांचा गळाच दाबून टाका.

    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : राज्यसभेत (rajya sabha) आज पुन्हा एकदा गोंधळ पाहण्यास मिळाला. बोलण्यासाठी उभ्या राहिलेल्या अभिनेत्री आणि सपाच्या खासदार जया बच्चन (jaya bachchan) आणि भाजपच्या (bjp) खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, 'मी तुम्हाला शाप देते की, तुमचे वाईट दिवस लवकरच येतील' अशी टीकाच जया बच्चन यांनी केली. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा आणि 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. यावेळी खासदार जया बच्चन आणि भाजपच्या खासदारांमध्ये राज्यसभेत जोरदार बाचाबाची पाहण्यास मिळाली. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. आपल्याला बोलू न दिल्यामुळे संतापलेल्या जया बच्चन यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी तुम्हाला लोकांचे आभार मानते, वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही बोलू देत नाही. तुम्ही आम्हा लोकांचा गळाच दाबून टाका. मग तुम्ही लोकांनी खुशाल चालवावे. आम्हाला न्याय हवा आहे, अशी भूमिका जया बच्चन यांनी मांडली. परंतु, त्यांना बोलण्यास थांबवले असता तेव्हा जया बच्चन चांगल्याच संतापल्या, हे काय चाललं आहे. तुम्ही लोक कुणासमोर बीन वाजवत आहात, तुम्हा लोकांचे वाईट दिवस लवकरच येणार आहे, अशी जळजळीत टीकाच बच्चन यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या