'या' सर्वांत तरुण आणि श्रीमंत आमदार महिलेचं यंदा डिपॉझिटही जप्त होणार?

राजस्थानातल्या विद्यमान आमदार कामिनी जिंदल तिथल्या सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत तरुण उमेदवार होत्या. त्यांच्या संपत्तीचा हिशोब ऐकलात तर अचंबित व्हाल. पण आता मात्र काहीशे मतं पदरात पडल्यानं त्यांचं डिपॉझिटही जप्त होण्याच्या मार्गावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 12:35 PM IST

'या' सर्वांत तरुण आणि श्रीमंत आमदार महिलेचं यंदा डिपॉझिटही जप्त होणार?

कामिनी जिंदल सध्या राजस्थानच्या श्रीगंगानगर मतदारसंघाच्या प्रतिनिधी आहेत. त्यांची मालमत्ता आणि संपत्ती राजेरजवाड्यांना मागे टाकेल एवढी आहे.

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत कामिनी यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राधेश्याम गंगानगर यांना ३७ हजारांपेक्षा जास्त मताधिक्यानं हरवलं.

आता मात्र या आमदार पराभवाच्या छायेत आहेत. हाती आलेल्या कलांनुसार त्यांना अगदी कमी मतं मिळाली आहेत आणि डिपॉझिटही जप्त होऊ शकतं.

Loading...

पंजाब युनिव्हर्सिटीमधून एम.फिलची डिग्री घेतलेल्या कामिनी सर्वांस तरुण आमदार आहेत हे विशेष.

पंजाब युनिव्हर्सिटीमधून एम.फिलची डिग्री घेतलेल्या कामिनी सर्वांत तरुण आमदार आहेत हे विशेष.

कामिनी यांच्याकडे लाखो रुपयांची घड्याळं आहेत. शिवाय BMW कारसुद्धा आहे.

मागच्या पाच वर्षांत कामिनी यांच्या संपत्तीत ९० कोटींची वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतल्या त्या सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेच्या हिशोबानुसार कामिनी जिंदाल यांच्याकडे २८७ कोटी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. आतापर्यंत एवढी संपत्ती फक्त राजघराणं किंवा संस्थानिकांच्या कडेच असायची.

नॅशनल युनियनिस्ट जमीनदारा पार्टीच्या त्या उमेदवार आहेत. BMW आणि त्याचबरोबर SUV फॉर्च्युनरसुद्धा कामिनी यांच्याकडे आहे.

कामिनी जिंदाल यांच्या बँक खात्यांत २३ कोटींची रक्कम (रु. 22,44,29,745.84) जमा आहे. रोख रकमेच्या त्यांनी दिलेल्या हिशोबाप्रमाणे त्यांच्याकडे ३,१०,००० तर त्यांच्या पतीकडे ३५,००० रुपये रोख होते.

कामिनी यांच्याकडे असलेल्या शेअर्स आणि कंपन्यांचं मूल्य २३७ कोटी ५९ लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.

विमा कंपन्यांना प्रीमिअम म्हणूनच त्या १७,६६,८४२ रुपये जमा करतात. कामिनी यांच्याकडे अडीच किलो सोनं आमि २३.४७ किलो चांदीचे दागिने आहेत.

कामिनी यांना महागड्या घड्याळांचा शौक आहे. त्यांच्याकडे ६ लाखांहून अधिक किमतीची घड्याळं आहे.

कामिनी जिंदाल या जमीनदार पार्टीचे अध्यक्ष बी. डी. अग्रवाल यांच्या कन्या आहेत. त्यांनी IPS ऑफिसर गगनदीप यांच्याशी लग्न केलंय.

कामिनी जिंदाल या जमीनदार पार्टीचे अध्यक्ष बी. डी. अग्रवाल यांच्या कन्या आहेत. त्यांनी IPS ऑफिसर गगनदीप सिंगला यांच्याशी लग्न केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 08:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...