एका लग्नाची गोष्ट! मोठ्या भावाची नियोजित पत्नी आता आहे लहान भावाची बायको, कसं ते वाचा

मोठ्या भावाच्या होणाऱ्या बायकोशी लहान भावाने लग्न केल्याचं समोर आलं आहे. असं नेमकं काय झालं की मोठ्या भावाऐवजी लहान भावाला लग्नासाठी बसावं लागलं.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 04:58 PM IST

एका लग्नाची गोष्ट! मोठ्या भावाची नियोजित पत्नी आता आहे लहान भावाची बायको, कसं ते वाचा

उत्तर प्रदेश, 05 नोव्हेंबर : लग्न समारंभ म्हटला की नवऱ्यामुलाच्या भावाचा आणि नवऱी मुलीच्या बहिणी थाट काही वेगळाच असतो. पण लग्नात नवरदेवच बदलल्याचं तुम्ही पाहिलंत का? असा एक धक्कादायक प्रकार खरंच घडला आहे. मोठ्या भावाच्या होणाऱ्या बायकोशी लहान भावाने लग्न केल्याचं समोर आलं आहे. असं नेमकं काय झालं की मोठ्या भावाऐवजी लहान भावाला लग्नासाठी बसावं लागलं. पोलीस तपासात असा धक्कादायक प्रकार समोर आला जो वाचल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.

सोमवारी दुपारी मुरादाबादमध्ये हरथला परिसरात लग्नाची वरात निघण्यापूर्वी एक युवती नवरदेव म्हणजे मोठा भाऊ प्रियकर असल्याचं सांगत मंडपात आली. त्यानंतर तिने प्रचंड गोंधळ घालत वरात थांबवली. इतकंच नाही तर तिने पोलिसांना बोलावून प्रियकराला पोलीस ठाण्यात पाठवलं. या गोंधळाच्या दरम्यान, वधू पक्षातून लग्नासाठी प्रचंड दबाव वाढत होता. मग अशात करायचं काय म्हणून वराच्या धाकट्या भावाने वरात काढली आणि लग्नाला नवरदेव म्हणूनही उभा राहिला.

हरथला पोलीस स्टेशन परिसरातील बाईक मिस्त्री याचे प्रेम प्रकरण जवळच्या मऊ गावात राहणाऱ्या एका तरूणीशी गेल्या 7 वर्षांपासून सुरू होते. सुरुवातीला दोघांचे कुटुंब या नात्यासाठी तयार नव्हते. परंतु नंतर त्यांनी त्यांची हट्टी गमावली आणि नात्यास सहमती दर्शविली. परंतु तरूणाने लग्नाच्या वेळी प्रेयसीला नकार दिला. दरम्यान, कुटुंबियांनी गुपचूप भोजपुरात युवकाचं लग्न जमवलं.

सोमवारी युवकाचं लग्न आहे हे तरुणीला समजलं आणि गोंधळ सुरू झावा. वरातीला सुरुवात होण्याआधी ती तिच्या आईसह तरूणाच्या घरी पोहोचली आणि गोंधळ उडाला. तिने पोलिसांनाही बोलावलं. पोलिसांनी वरात थांबवली आणि नवरदेवाला पोलीस ठाण्यात नेलं. पोलीस ठाण्यातही मुलीने प्रियकराशी लगेच विवाह करण्याच्या आग्रह धरला.

लग्नाच्या मंडपात सगळे वऱ्हाड जोडप्यावर अक्षता टाकण्यासाठी तयार होतं. पण नवरदेव पोलीस ठाण्यात होता. त्यामुळे मंडपात एकच गोंधळ उडाला. अशात परिस्थिती सांभाळण्यासाठी चक्क नवरदेवाच्या लहान भावाने विवाह उरकून घेतला. या सगळ्या प्रकारानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...