Home /News /national /

कंडक्टरने बसायला सांगितलं म्हणून युवतीने लगावली कानशिलात; मित्रांना बोलावून केला फुल्ल राडा

कंडक्टरने बसायला सांगितलं म्हणून युवतीने लगावली कानशिलात; मित्रांना बोलावून केला फुल्ल राडा

बस चालकाजवळ (Bus Driver) उभ्या असलेल्या तरुणीला कंडक्टरने (Conductor) सीटवर बसण्यास सांगितलं म्हणून संतापलेल्या युवतीने कंडक्टरच्या कानशिलात (Beat) लगावली आणि बसचीही तोडफोड केली.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : बसमध्ये प्रवास करणार्‍या युवतीला सल्ला देणं दिल्लीतील एका कंडक्टरला खूपच महागात पडलं आहे. दिल्लीतील एक तरुणी बस चालकाच्या जवळ उभी होती. ते पाहून कंडक्टरने तिला उभं राहण्याऐवजी सीटवर बसण्याचा सल्ला दिला. यावरून ती भडकली. त्या दोघांच्यात बोलाचाली झाली आणि तिने रागाच्या भरात कंडक्टरच्या कानशिलात लगावली. एवढ्यावरच प्रकरण थांबलं नाही तर या युवतीने नंतर प्रचंड राडा घातला. कंडक्टरला मारहाण केल्यानंतर या तरुणीने काही तरुणांनाही बोलावून घेतलं. त्या आलेल्या तरुणांनीही कंडक्टरला मारहाण केली आणि बसची तोडफोडही केली. या घटनेनंतर पीडित कंडक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित कंडक्टरच्या सांगण्यावरून  द्वारका नॉर्थ पोलिस ठाण्यात आरोपी महिला आणि तिने बोलावलेल्या तरूणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बसमध्ये तोडफोड केल्याचा आरोप मिळालेल्या माहितीनुसार, शिव कुमार शादिपूर बस डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करतात. बुधवारी त्यांची ड्यूटी नेहरू प्लेस मार्गावरील बससाठी होती. द्वारका सेक्टर 3 येथील नेताजी सुभाष टेक्नॉलॉजी संस्थेजवळ बस पोहचल्यानंतर आरोपी युवती बसमध्ये चढली. ती युवती बसमध्ये उभी राहून प्रवास करत होती. कंडक्टरने त्या युवतीला उभे राहून प्रवास करण्याऐवजी बसण्यास सांगितले. कंडक्टरचा सल्ला ऐकून मुलगी काही काळ सीटवर बसली. पण पून्हा अचानक ड्रायव्हरजवळ जाऊन उभी राहिली. ड्रायव्हरनेही आक्षेप घेऊन मुलीला पून्हा बसण्यास सांगितले. यावर त्या महिलेनं प्रत्युत्तर देत सांगितलं की तिला मधु विहार येथे जायचं आहे. त्यानंतर ड्रायव्हरने त्या युवतीला खाली बसण्यास सांगितले आणि स्टॉप आला की बस थांबव, असं त्यानं सांगितलं. मुलीने कंडक्टरच्या कानशिलात लगावली असा आरोप आहे, की त्या महिलेनं ड्रायव्हरचं म्हणणं ऐकलं नाही आणि वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाढता वाद लक्षात घेता कंडक्टरही तिथे पोहोचला आणि त्या युवतीला सीटवर बसण्यास सांगितलं. यामुळे ती युवती संतापली आणि ती कंडक्टरला शिवीगाळ करू लागली. हे प्रकरण इतकं वाढलं की त्या युवतीने कंडक्टरच्या कानशिलात लगावली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या