मराठी बातम्या /बातम्या /देश /

सात वर्षांपासूनचं प्रेम क्षणात संपलं! प्रियकराकडून लोखंडी रॉडनं वार करत तरुणीची हत्या

सात वर्षांपासूनचं प्रेम क्षणात संपलं! प्रियकराकडून लोखंडी रॉडनं वार करत तरुणीची हत्या

Murder News: सात वर्षे जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच तरुणीची प्रियकरानं लोखंडी रॉडनं वार करत हत्या (Boyfriend killed girlfriend) केली आहे.

Murder News: सात वर्षे जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच तरुणीची प्रियकरानं लोखंडी रॉडनं वार करत हत्या (Boyfriend killed girlfriend) केली आहे.

Murder News: सात वर्षे जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच तरुणीची प्रियकरानं लोखंडी रॉडनं वार करत हत्या (Boyfriend killed girlfriend) केली आहे.

  • Published by:  News18 Desk

लखनऊ, 25 जुलै: सात वर्षे प्रेमसंबंध (Love affair) ठेवल्यानंतर, शेवटी लग्नाला नकार दिल्यानं (Refused to marriage) एका तरुणानं आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार (Beat with iron rod) करत तिची निर्घृण हत्या केली आहे. प्रेयसीच्या हत्या (Girlfriend murder) केल्यानंतर आरोपीनं देखील विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर, आरोपी प्रियकर बचावला आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला रुग्णालयातून अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीनं हत्येची कबुली दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या बकेवर येथील आहे. हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणीचं नाव रुची आहे. याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय प्रियकर अमित ऊर्फ खुशीलाल याला अटक केली आहे. मृत रुची आणि आरोपी अमित यांच्यात मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघंही एमएच्या द्वितीय वर्षात शिकत होते. दरम्यान मृत रुचीचं तिच्या नात्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्याचा संशय आरोपी अमितला आला.

हेही वाचा-VIDEO: प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; प्रेयसीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार

त्यामुळे आरोपीनं रुचीला शेतात भेटायला बोलवलं. याठिकाणी भेटल्यानंतर आरोपीनं रुचीला लग्नासाठी मागणी घातली. पण रुचीनं लग्नासाठी नकार दिला. यामुळे संतापलेल्या अमितने रुचीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जबरी घाव घातले. या हल्ल्यात रुची घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान गावातील काही लोकांना रुची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. या घटनेची माहिती कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीनं रुचीला रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच रुचीला मृत घोषित केलं आहे.

हेही वाचा-4 वर्ष प्रेम अन् अचानक लग्नाला नकार, तरुणीने विष पिऊन संपवले आयुष्य, प्रियकरावर

दुसरीकडे, आरोपीनं प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्यानंतर, स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला त्वरित रुग्णालयात हलवल्यानं त्याचा जीव वाचला आहे. रुग्णालयात दोन दिवस उपचार केल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन अटक केली आहे. आरोपी अमितची चौकशी केली असता. त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. रुची माझी नाही झाली, तर मी कुणाचीच होऊ देणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे मी तिची हत्या केली असल्याची माहिती आरोपी प्रियकर अमितनं पोलिसांना दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime, Crime news, Love, Murder, Murder news, Relationship, Uttar pradesh