20 रुपयांचं Petrol भरण्यासाठी तरुणी पोहोचली पंपावर; 2 थेंब पेट्रोल हातावर टेकवल्यानं झाली हैराण, पाहा VIDEO

Viral Video: देशात इंधनाच्या वाढत्या दरावरून मजेदार मीम्स आणि व्हिडीओ (Viral memes and video) तयार केले जात आहेत. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Viral Video: देशात इंधनाच्या वाढत्या दरावरून मजेदार मीम्स आणि व्हिडीओ (Viral memes and video) तयार केले जात आहेत. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जून: मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and diesel rates) गगनाला भीडत आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे सोशल मीडियावर अनेकजण सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे इंधनाच्या वाढत्या दरावरून मजेदार मीम्स आणि व्हिडीओ (Viral memes and video) देखील तयार केले जात आहेत. अशा या व्हिडीओ आणि मीम्सच्या माध्यमातून सरकारवर उपरोधिक टीका केली जात आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामुळे अनेकांना हसू आवरता येत नाहीये. संबंधित व्हिडीओमध्ये एक तरुणी आपली स्कुटी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आली आहे. याठिकाणी तिनं 20 रुपयांचं पेट्रोल भरण्याची विनंती पेट्रोल भरणाऱ्या तरुणाला केली आहे. तरुणीनं 200 रुपयांचं पेट्रोल टाकायला लावलं असल्याचं तरुणाला सुरुवातीला वाटलं. पण तरुणीनं फक्त 20 रुपयांचं पेट्रोल भरायचं असल्याचं सांगत डिक्की उघडण्याचा प्रयत्न करते. यावेळी पेट्रोल भरणाऱ्या तरुणानं मजेदार उत्तर दिलं आहे. पेट्रोल भरणाऱ्या तरुणाने संबंधित तरुणीला म्हटलं की, '20 रुपयांचं पेट्रोल भरण्यासाठी स्कुटीची डिक्की उघडण्याची आवश्यकता नाही', असं म्हणत त्यानं तरुणीच्या हातातच 20 रुपयांचं दोन थेंब पेट्रोल टेकवले आहेत. यावेळी तरुणी हातात पेट्रोल टाकण्यामागचं कारण विचारते. तेव्हा तरुण म्हणतो की 20 एवढंच पेट्रोल मिळत. हे पेट्रोल हवं तर डोक्यावर ओतून घे नाहीतर दुचाकीत भर. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.
    हेही वाचा-VIDEO: अरे हे काय! मच्छीमाराला माशाच्या पोटात मिळाली Whisky ची बॉटल या व्हिडीओला आतापर्यंत 70 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओ मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहे. या प्रतिक्रिया वाचूनही अनेका हसू आवरता येत नाहीये.
    Published by:News18 Desk
    First published: