Home /News /national /

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचं पोलिसांनी लावलं प्रियकराशी लग्न; वाचा संपूर्ण प्रकरण

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचं पोलिसांनी लावलं प्रियकराशी लग्न; वाचा संपूर्ण प्रकरण

एका प्रेमी जोडप्यामध्ये कोणत्यातरी कारणावरुन भांडण झालं. नाराज झालेल्या तरुणीने आत्महत्येच्या उद्देशाने स्वत:ला जखमी करुन घेतलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तरुण-तरुणीचं लग्न लावून दिलं.

    नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पोलिसांचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. येथील गोविंदपुरी भागात राहणाऱ्या एका प्रेमी जोडप्यामध्ये कोणत्यातरी कारणावरुन भांडण झालं. नाराज झालेल्या तरुणीने आत्महत्येच्या उद्देशाने स्वत:ला जखमी करुन घेतलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तरुण-तरुणीचं लग्न लावून दिलं. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी कन्यादानाच्या रुपात त्यांना भेटही दिली. आता या घटनेची संपूर्ण भागात मोठी चर्चा असून पोलिसांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी आपल्या प्रियकराशी लग्न करु इच्छित होती. परंतु दोघांमधील भांडणामुळे हे लग्न होणं कठिण झालं होतं. याचदरम्यान 3 ऑक्टोबर रोजी गोविंदपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला की, 24 वर्षीय एका तरुणीने लग्नाला नकार मिळाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वत:ला जखमी केलं आहे. त्यानंतर पोलिसांना चौकशीदरम्यान, तरुणी आणि तिचा प्रियकर मागील 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यात काही गैरसमज झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची संमती मिळवली. काऊंसिलिंगनंतर दोन्ही कुटुंबियांनी त्या दोघांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी आर्य समाज मंदिरात दोघांचा विवाहसोहळा पार पडला आणि नवविवाहित जोडपं आशिर्वाद घेण्यासाठी पोलिस स्टेशन गोविंदपुरी पोहचलं. नवविवाहित जोडप्याला पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी 'कन्यादान' आणि भेटवस्तू देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, एप्रिल महिन्यातही अशाचप्रकारे पोलिसांच्या मदतीने एक लग्न झालं होतं. लॉकडाऊन दरम्यान साध्या पद्धतीने एका जोडप्याचं लग्न झालं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत, कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. परंतु विदाईवेळी मोठा गोंधळ झाला आणि मुलाच्या वडिलांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनीही अशा आनंदाच्या क्षणी त्यांची समस्या समजून घेऊन मदत केली. नवऱ्यामुलीच्या विदाईसाठी पोलिसांनी स्वत: जिप्सीची व्यवस्था केली होती. या अनोख्या विदाईनंतर सर्वांनीच पोलिसांचे आभार मानले होते.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या