Home /News /national /

Shocking! चालत्या ट्रेनच्या दारात उभा होती तरुणी, अचानक वेग वाढताच तोल गेला अन्..

Shocking! चालत्या ट्रेनच्या दारात उभा होती तरुणी, अचानक वेग वाढताच तोल गेला अन्..

ट्रेन रोसडा स्टेशनच्या जवळ पोहोचली, तेव्हा ही तरुणी ट्रेनच्या (Train) दरवाजाजवळ उभा राहिली. याचदरम्यान ट्रेनच्या स्पीडमुळे तरुणीचा तोल गेला आणि ते ट्रेनमधून खाली पडली.

    पाटणा 12 ऑगस्ट : चालत्या ट्रेनमधून कोसळलेल्या महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला (Woman Died After Falling off a Running Train) आहे. ट्रेनमधून कोसळल्यानंतर ही महिला गंभीर जखमी झाली होती. यानंतर तिला जखमी अवस्थेतच जीआरपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यानच महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या (Bihar) समस्तीपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमध्ये (Rajdhani Express) घडली. पिंपरीत लोखंडी रॉडने मॅनेजरची हत्या; संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, कारण... डिब्रूगढ येथून नवी दिल्लीकडे निघालेल्या राजधानी एक्सप्रेसनं तरुणी प्रवास करत होती. जेव्हा ट्रेन रोसडा स्टेशनच्या जवळ पोहोचली, तेव्हा ही तरुणी ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहिली. याचदरम्यान ट्रेनच्या स्पीडमुळे तरुणीचा तोल गेला आणि ते ट्रेनमधून खाली पडली. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली. जीआरपी पोलिसांनी तिला तात्काळ रोसडा आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र. याचा काहीही उपयोग झाला नाही. डेटिंग पार्टनरला भेटण्यासाठी बोलवत हत्या; नरभक्षक शिक्षकानं तुकडे करून खाल्लं तरुणीची अवस्था गंभीर असल्यानं तिला दुसरं रुग्णालय रेफर केलं. मात्र, त्याठिकाणी पोहोचताच डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केलं. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. रोसडा जीआरपीचे एएसआय लालबाबू शुक्ला यांनी सांगितलं, की स्थानिक लोकांकडून अशी माहिती मिळाली होती, की रोसडा रेल्वे स्टेशन आणि गुमतीच्या मध्ये एक तरुणी राजधानी एक्सप्रेसमधून खाली पडली आहे. यानंतर तात्काळ घटनास्थळी पोहोचून तरुणीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं. 1 हत्या, 2 आरोपी, 170 CCTV कॅमेरे, 230 जणांची चौकशी; असं फुटलं आरोपींचं बिंग
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Train, Train accident

    पुढील बातम्या