Home /News /national /

सासू-सासऱ्यांनीच लावून दिलं सुनेचं दुसरं लग्न; बंगलाही दिला भेट, कारण जाणून पाणावतील डोळे

सासू-सासऱ्यांनीच लावून दिलं सुनेचं दुसरं लग्न; बंगलाही दिला भेट, कारण जाणून पाणावतील डोळे

सासू-सासऱ्यांनी आई-वडिलांची भूमिका पार पाडत सुनेचे कन्यादान (Kanyadan) केले आहे. आपल्या मुलाचा कोरोना काळात मृत्यू (Death in Corona) झाला होता. त्यानंतर घरात विधवा सून (Widow Daughter in law) आणि त्याची मुलगी होती.

  धार, 13 मे : सासू-सासऱ्यांनी आई-वडिलांची भूमिका पार पाडत सुनेचे कन्यादान (Kanyadan) केले आहे. त्यांच्या मुलाचा कोरोना काळात मृत्यू (Death in Corona) झाला होता. त्यानंतर घरात विधवा सून (Widow Daughter in law) आणि तिची मुलगी होती. यावेळी सासू-सासऱ्यांनी सूनेचा एकटेपणा आणि तिचे दु:ख समजून घेतले. आयुष्याचा प्रवास एकट्याने नाही होऊ शकत, म्हणून तिच्यासाठी जीवनसाथी शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यानंतर तिचं लग्न लावून देत आशिर्वाद दिले. कोरानाकाळात आनंदाला ग्रहण -  ही कहाणी धार येथील तिवारी परिवारातील आहे. येथील युग प्रकाश तिवारी यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श मांडला आहे. त्यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून दिले. तसेच तिचे कन्यादान केले. इतकेच नव्हे तर तिला राहण्यासाठी लग्नामध्ये बंगला भेट दिला. धारच्या प्रकाश नगर येथील रहिवाशी युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी तिवारी यांचे आयुष्य आनंदात सुरू होते. घरात दोन मुले, सून, नात होते. मात्र, कोरोनाकाळात त्यांच्या आनंदाला ग्रहण लागले. कोरोनाकाळात त्यांचा लहान मुलगा प्रियंक तिवारी याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरात विधवा सून ऋचा आणि नात होती. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील आनंद संपला होता. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर -  प्रियंक हा सॉफ्टवेअर इंजीनिअर होता. तो भोपाळ येथे मंडी दीपमध्ये एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता. त्याचे वय फक्त 34 वर्ष होते. मात्र, कोरोनाकाळात त्याचा मृत्यू झाला. यानंतर तिवारी कुटुंबावर तर आभाळच कोसळले. यातून ते कसेबसे सावरले. मात्र, पुढे प्रश्न होता तो विधवा सून आणि नातीचा. त्यांनी सूनेचा लग्न लाऊन तिने नवीन आयुष्य सुरू करावे, असा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी तिच्यासाठी एक नागपूर येथील वरुण मिश्रा याच्या रुपात एक चांगले स्थळ शोधले. यानंतर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ऋचा हिचे लग्न आणि कन्यादान करुन तिची पाठवणी केली. प्रियंकने घर खरेदी केले होते. तिवारी परिवाराने ते घर ऋचाला लग्नात भेट म्हणून देऊन दिले. हेही वाचा - Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO
  हा निर्णय घेणे सोपे नव्हते - 
  युग प्रकाश तिवारी आणि त्यांची पत्नी रागिनी या दोघांसाठी आपल्या विधवा सूनेचे लग्न पुन्हा लावून देणे सोपे नव्हते. आधी त्यांनी आपल्या मुलाला गमावले आणि नंतर सुनेलासुद्धा आपल्यापासून वेगळे करणे सोपे नव्हते. रागिनी तिवारी म्हणाल्या की, ऋचा खूप चांगली आहे. आम्ही तिला मुलगी मानले आहे. मुलगी मानले म्हणूनच तिचा आणि नातीच्या भविष्याचा विचार करत तिचे लग्न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांनी समाजालाही आवाहन केले आहे की, आपल्या सुनेला मुलीसारखे प्रेम द्यावे. हुंड्यासाठी तिचा छळ करू नका. भावाच्या आठवणीत लिहिले पुस्तक - प्रियंकचा मोठा भाऊ मयंक तिवारी यांनी आपल्या छोट्या भावाच्या आठवणीत पुस्तकाच्या रुपात साठवल्या आहेत. त्यांनी प्रियंकच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव 'जीवन का मानचित्र असे आहे'.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Madhya pradesh, Marriage

  पुढील बातम्या