प्रेमाच्या जाळ्यात अडकवत 30 पेक्षा अधिक महिला, तरुणींवर बलात्कार

प्रेमाच्या जाळ्यात अडकवत 30 पेक्षा अधिक महिला, तरुणींवर बलात्कार

लग्न आणि प्रेमाचं आमिष दाखवत 30 तरूणी आणि महिलांवर बलात्कार करण्यात आला आहे.

  • Share this:

रायपूर, 17 मे : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 30 पेक्षा अधिक महिला आणि तरूणींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या वासनांधानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये केलेल्या कृत्याची दखल आता गृहमंत्री, महिला आयोग, पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आहे. दाखल झालेल्या तक्रारीवर आता पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. शिवाय, आरोपीनं व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून दबाव टाकत पैशांची देखील मागणी करण्यात आली. गगनदिप सिंह ऊर्फ रिची भलाई असं आरोपीचं नाव असून तो वैशाली नगरचा रहिवासी आहे. गगनदिप सिंहवरती दुर्ग, भिलाई, जगदलपूर, जोधपूर, इंदूर शहरामधील तरूणी आणि महिलांनी बलात्काराचा आरोप केला आहे. प्रेम आणि लग्न करण्याचं वचन देत गगनदिप सिंह महिला, तरूणींशी शरीरसंबंध ठेवत होता. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा. या साऱ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.


नथुराम गोडसेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ; अमित शहांनी घेतली दखल

कसं आलं प्रकरण समोर

भिलाईमधील एका महिलेनं याबद्दल वाच्यता केली. 2 महिन्यांपूर्वी पीडितेसोबत गगनदिपची ओळख झाली. मित्राच्या मदतीनं ही ओळख झाली. त्यानंतर त्यानं महिलेला रायपूरमधील घरी बोलावलं. शिवाय, गैर फायदा देखील उठवला. काही दिवसानंतर फोटो आणि व्हिडीओच्या मदतीनं 2 लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ, फोटो पतीला दाखवण्याची धमकी देखील दिली.

तर, वैशाली नगरमधील एका महिलेकडे देखील अशाच प्रकारे पैशांची मागणी करण्यात आली. पीडितेनं उधार घेत गगनदिपला पैसे दिले. तिनं आपला मोबाईल नंबर देखील बदलला. त्यानंतर उसने घेतलेल्या लोकांचा तगादा देखील मागे लागला. पीडितेच्या पतीनं याबद्दल चौकशी केल्यानंतर तिनं धीर करत सारा प्रकार सांगितला.

अशा एक ना अनेक तक्रारी दाखल झाल्या असून पोलिस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत.


VIDEO: मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, आरक्षणप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: May 17, 2019 01:57 PM IST

ताज्या बातम्या