तरुणाने Viagra चा घेतला Overdose; तब्येत बिघडल्यानंतर अनेक रुग्णालयात केली पायपीट, मात्र...

तरुणाने Viagra चा घेतला Overdose; तब्येत बिघडल्यानंतर अनेक रुग्णालयात केली पायपीट, मात्र...

अनेक दिवसांपासून शहरातील विविध रुग्णालयातून तो उपचार घेत होता, मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

  • Share this:

भोपाळ, 12 डिसेंबर : मध्यप्रदेशची राजधानी भोपालमधील (Bhopal) पिपलानी भागात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रायसेन येथे राहणारा हा तरुण भोपाळमध्ये एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 ते 6 दिवसांपासून तरुणाची तब्येत बिघडली होती. उपचाराचा चांगला परिणाम होत नसल्याने अनेक रुग्णालयातून तो उपचार घेत होता.

बुधवारी रात्री तरुणाची तब्येत अचानक जास्त बिघडली. त्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. गुरुवारी उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला पोटदुखीबरोबरच सातत्याने उलट्या होत होत्या. मात्र रुग्णालयात उपचार केला जात असतानाही त्याची तब्येत सुधारू शकली नाही. कुटुंबीयांनी सांगितलं की वायग्राचं अधिक सेवन (Viagra overdose) केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी तरुणाचं शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला आहे. पीएम रिपोर्ट आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमके कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं. पिपलानी पोलिसांनी सांगितलं की, 25 वर्षीय तरुण अद्याप अविवाहित आहे. तो रायसेन रोडजवळ आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तीन भावांमध्ये तो सर्वात मोठा होता. तर मृत तरुणाचे वडील भोपाळमधील एका सरकारी सोसायटीमध्ये नोकरी करतात. तरुणाने आजारानंतर भोपाळमधील अनेक रुग्णालयातून उपचार घेतला. मात्र त्याच्या तब्येतीत काहीच सुधार झाला नाही. वायग्राचा अधिक डोज घेतल्याचे त्याने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: December 12, 2020, 6:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या