Home /News /national /

43 तासांपासून दरीत अडकलेला तरुण, बचावासाठी लष्कराचं Live रेस्क्यू ऑपरेशन

43 तासांपासून दरीत अडकलेला तरुण, बचावासाठी लष्कराचं Live रेस्क्यू ऑपरेशन

हा तरुण अडकून 43 तासांहून अधिक काळ लोटला असूनही अद्यापही बचावकर्ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत किंवा त्याला अन्न-पाणीही पुरवू शकलेले नाही.

    केरळ, 09 फेब्रुवारी: केरळमधील पलक्कड (Palakkad, Kerala) येथील कुरमबाची डोंगराच्या फॉल्ट (Fault Line) लाइन (खड्डा,दरी) मध्ये 23 वर्षीय तरुण अडकला (Trapped) आहे. अडकलेल्या 23 वर्षीय तरुणाला बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराचे बचावकार्य (Rescue operations) सुरू आहे. हा तरुण अडकून 43 तासांहून अधिक काळ लोटला असूनही अद्यापही बचावकर्ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत किंवा त्याला अन्न-पाणीही पुरवू शकलेले नाही. दरम्यान भारतीय लष्कराच्या गिर्यारोहक पथकाला अडकलेल्या तरुणांच्या सुमारे 200 मीटरपर्यंत पोहोचण्यात यश आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्व आधुनिक उपकरणांसह लष्कराचे तज्ज्ञ बचाव कार्यासाठी मलमपुझा येथील चेराड हिलवर पोहोचले आहेत. आर बाबू असं अडकलेल्या तरुणाचं नाव असून तो मलमपुझा येथील चेराडूतला रहिवासी आहे. सोमवारी दुपारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एलाचिराम येथे जवळच्या कुरुंबाची डोंगरावरून खाली उतरत असताना दरीच्या खड्डयात पडला. आर बाबू आणि इतर तीन मित्र डोंगरावर जात असताना ही घटना घडली. तरुणाला वाचवण्यासाठी दोन लष्करी अधिकारी, दोन जेसीओ आणि इतर पाच कॉन्स्टेबल काल रात्री वेलिंग्टन येथून घटनास्थळी पोहोचले आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरनं मंगळवारी बचावकार्याचा प्रयत्न केला, मात्र खराब हवामानामुळे हे ऑपरेशन पूर्ण होऊ शकले नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा प्रयत्न केला जात आहे. भारतीय वायुसेनेने भारतीय लष्कराची आणखी एक गिर्यारोहक टीम बेंगळुरूहून सुलूरला मलमपुझासाठी पाठवली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मंगळवारी तरुणांना वाचवण्यासाठी लष्कराची मदत मागितली. यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडूनही मदत घेण्यात आली होती. दक्षिण भारताचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC), लेफ्टनंट जनरल ए अरुण यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती दिली की, बचाव कार्यासाठी एक विशेष टीम पलक्कडला रवाना झाली आहे. दरम्यान, बंगळुरूहून पॅरा कमांडोंची आणखी एक टीम पलक्कडला रवाना झाली आहे. त्यांना बंगळुरूहून सुलूर एअरबेसवर विमानाने नेण्यात आले आणि नंतर ते रस्त्याने मालमपुझा येथे पोहोचले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या