पाटना, 25 मे : मुख्यमंत्री नितीशकुमार
(CM Nitish Kumar) यांनी बिहारमधील लॉकडाऊन पुन्हा 1 जूनपर्यंत वाढवला आहे. त्यांनी ट्विटरवर या निर्णयाविषयी माहिती देताना सांगितलं की, लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाला आहे आणि कोरोना संसर्गामध्ये
(Corona Infection) घट दिसून येत आहे. त्यामुळं 1 जून 2021 पर्यंत बिहारमध्ये टाळेबंदी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री नितीश
(CM Nitish Kumar) यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, पंकज कुमार गुप्ता नावाच्या तरुणानं त्यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत तुम्हाला माझी हाय लागंल, असं म्हणत कमेंट केली आहे. त्यामुळं हा तरुण आणि त्याची प्रेयसी पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.
पंकज कुमारनं मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर कमेंट केली आहे की, सर, तुम्ही नाकर्ते मुख्यमंत्री आहात. आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. मी तुम्हाला किती विनंती केली होती की, माझ्या मैत्रिणीचं 19 मे रोजी लग्न होतं ते कृपया थांबवा. त्यावर तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाही. फक्त माझ्या बेकारीमुळं ती माझी होऊ शकली नाही. याबद्दल तुम्हाला माझी हाय लागेल.

काही दिवसांपूर्वी नितीशकुमार यांनी लॉकडाऊन संदर्भात ट्विट केल्यानंतर पंकजनं कमेंट बॉक्समध्ये लिहिलं होतं की, 'सर, जर या दरम्यान लग्नासारख्या कार्यक्रमांनाही बंदी घातली असती तर माझ्या गर्लफ्रेंडचं 19 मे रोजी होणारं लग्नही थांबले असते. आम्ही आयुष्यभर तुमचे आभारी राहिलो असतो. या कमेंटनंतर नव्या कुमारी नावाच्या एका अकाऊंटवरून या कमेंटला भारी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
हे वाचा -
Steve Smith कधीच बनू शकणार नाही ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन? बॉलशी छेडछाड प्रकरण भोवणार
नव्या कुमारीनं या कमेंटला उत्तर देताना लिहिलं आहे की, 'जेव्हा तू मला सोडून पूजाशी बोलायला गेलास तेव्हा मीसुद्धा खूप रडले होते. आता मी आनंदानं लग्न करीत आहे तर तू आता असं प्लीज करू नको. पण पंकज, जरी मी कोणाशीही लग्न केलं तरी माझ्या हृदयात नेहमी तूच असशील. तू माझ्या लग्नाला नक्की ये, शेवटी तुला पाहून मला विदा व्हायचं आहे, असे म्हटलं आहे. मात्र, हे ट्वीट खरंच एखाद्या मुलीनं केलंय की, कोणी फेक खात्यावरून केलंय याबाबत माहिती नाही. बऱ्याचदा बनावट खात्यावरूनही एखाद्याची गमंत करण्यासाठी अशा कमेंट देण्यात येतात. मात्र, याबाबत खात्रीलायक काही माहीत नसले तरी या दोन कमेंटची मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ट्विटपेक्षाही अधिक चर्चा त्यावेळी झाली होती आणि आताही पंकजकुमारनं केलेल्या या कमेंटमुळं तो पुन्हा चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.