डोकं सुन्न करणारी बातमी; कुत्र्यावरच केला बलात्कार; CCTVमुळे उघड झाले दुष्कृत्य

डोकं सुन्न करणारी बातमी; कुत्र्यावरच केला बलात्कार; CCTVमुळे उघड झाले दुष्कृत्य

बलात्काराची एक विचित्र घटना समोर आली आहे जी वाचल्यानंतर तुमचे डोक सुन्न होईल.

  • Share this:

एटा, 10 ऑक्टोबर: बलात्काराच्या अनेक घटनांच्या बातम्या तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील पण उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मध्ये बलात्काराची एक विचित्र घटना समोर आली आहे जी वाचल्यानंतर तुमचे डोक सुन्न होईल. बलात्कारा(Rape)च्या या घटनेत एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा युवकांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या घरातील कुत्र्यावर बलात्कार केला. ही घटना एटा शहरातील आहे. बलात्काराच्या या घटनेनंतर संबंधित कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एटा शहरातील मलावन पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. नीरज पाठक यांनी त्यांच्या घरात कुत्रा पाळला होता. या कुत्र्यावर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नीरज दीक्षित आणि उमेश चंद्र यांनी बलात्कार केल्याचा आरोप पाठक यांनी केला. यासंदर्भातील तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पाठक यांची यांची तक्रार दाखल करून घेतली असून दोघांविरुद्ध पशु विरुद्ध अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CCTVमुळे सत्य समोर आले

नीरज दीक्षित आणि उमेश चंद्र या दोघांनी केलेल्या दुष्कृत्य तेव्हा समोर आले जेव्हा पाठक यांनी त्यांच्या घराबाहेर लावलेले CCTV फुटेज चेक केले. धक्कादायक म्हणजे या दोघांनी एका नव्हे तर रोज कुत्र्यावर बलात्कार केला होता. त्यांनी केलेल्या या दुष्कृत्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पाठक यांनी असा आरोप केला आहे की, स्थानिक पोलीस या प्रकरणी तक्रार नोंदवण्यास किंवा कारवाई करण्यास तयार होत नव्हेत. अखेर त्यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय कुमार यांची भेट घेतली आणि संबंधिक घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुमार यांनी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2019, 8:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading