लखनऊ, 03 जून: दुचाकी अडवल्यानं तरुण-तरुणीनं भररस्त्यात हायवोल्टेज ड्रामा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वाहन चेकिंग करताना अडवल्यानं दुचाकीवर रस्त्यात पोलिसांना अर्वाच्च भाषा वापरत उत्तरं दिली. ही घटना लखनऊमधील हजरतगंज परिसरात घडली आहे. दुचाकी चालवणारा तरुण आणि तरुणी पोलीस आणि वाहतूक पोलिसांशी उद्धटासारखं बोलत असल्याचं समोर आलं आहे.
लखनऊच्या रस्त्यावर दोन तरुणांचा हा हायवोल्टेज ड्राम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान वाहतूक पोलिसांनी फाडलेल्या रिसीटवर गाडीचा नंबर चुकीचा असल्याचा आरोपी तरुणानं केला आहे.
वाहतूक पोलिसांनी अडवल्यानं दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीचा हायवोल्टेज ड्रामा VIDEO pic.twitter.com/sMdR115rBa
मिळालेल्या माहितीनुसार तरुणाकडे गाडीची कागदपत्र नसल्यानं वाहतूक पोलिसांनी अडवलं. त्यांनी विचारणा केली असतान उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंड भरायला लावला पण पावती देण्यास नकार दिल्याचा आरोप या तरुणानं केला आहे. जी पावती फाडून दिली त्यावर गाडी नंबरही चुकीचा असल्याचा आरोप या तरुणानं केला आहे. वाहन चेकिंगदरम्यान हा संपूर्ण प्रकार लखनऊ इथे घडला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.