शायनिंग मारणं पडलं महागात, दंडाची पावती पाहून बुलेट चालकाला फुटला घाम

शायनिंग मारणं पडलं महागात, दंडाची पावती पाहून बुलेट चालकाला फुटला घाम

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आपली हौस पुरी करणं तरुणाला चांगलच महागात पडलं आहे.

  • Share this:

जींद, 26 फेब्रुवारी : देशभरात वाहतुकीचे नवे नियम लागू झाल्यानंतर त्याची अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याचं वारंवार दिसून येत आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बुलेटराजाला चांगलाच दंड भरावा लागला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. जींद इथे बुलेवटरून जाणाऱ्या तरुणाला वाहतूक पोलिसांनी अडवलं वाहतुकीचे सगळे नियम तोडणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी रोखलं आणि त्याचा समाचार घेत चांगलीच दंडाची पावती फाडली. बुलेटवरून फटाके वाजवण्याचा या तरुणाचा हा शौक त्याच्याच अंगाशी आला आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला हेल्मेट आणि गाडीच्या कागदपत्रांविषय़ी विचारणा केली तेव्हा त्यांची पळताभुई थोडी झाली होती. त्याच्याकडे हेल्मेटही नव्हतं ना गाडीचे कागदपत्र, शिवाय हा तरुण चुकीच्या बाजूनं गाडी चालवत होता. त्याच्यासोबत दोन युवकही म्हणजे ट्रीपल सीट जात होते. वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून रोमिओसारखं फिरणाऱ्या या तरुणाच्या हातावर पोलिसांनी गलेलठ्ठ दंडाची पावती टेकवली आहे. ही दंडाची पावती पाहून तरुणाला चांगलाच घाम फुटला.

हेही वाचा-दंगलखोरांनी 19 वर्षीय युवकाच्या डोक्यात खुपसलं ड्रिलमशीन, पाहा थरारक PHOTO

पोलिसांनी या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही कऱण्यात आला इतकच नाही तर दंड भरावा लागू नये म्हणून या तरुणानं विरुद्ध दिशेनं दुचाकी वळवली आणि पळ काढण्याचा प्रयत्न करत होता मात्र वाहतूक पोलिसांनी त्याला घेरलं आणि दंड भरायला लावला.

डीएसपी कप्तान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक पोलीस ASI सुशील कुमार यांच्या टीमने या बुलेट चालकाला विनाहेल्मेट, कागदपत्राविना वाहतुकीचे नियम मोडून दुचाकी चालवल्याप्रकऱणी 41 हजार रुपयांचा दंड भरायला लावला आहे. या बुलेट चालकाविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. मात्र वाहतूक पोलिसांना हा तरुण चकवा देत होता. मात्र त्याला मंगळवारी पकडून दंड आकारण्यात आल्याची माहिती डीएसपी सिंह यांनी दिली आहे.

हेही वाचा-लग्नाचा वाढदिवस आणि 3 मुलांची पित्रृछाया; अश्रू आणणारा रतनलाल यांचा शेवटचा दिवस

First published: February 26, 2020, 1:12 PM IST

ताज्या बातम्या