धक्कादायक! 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष घेऊन तरुण परदेशात काढणार होता पळ, पण...

धक्कादायक! 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष घेऊन तरुण परदेशात काढणार होता पळ, पण...

32 वर्षांचा तरुण, वेष घेतलं 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचं, पण सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अलगद सापडला जाळ्यात...

  • Share this:

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (9 सप्टेंबर) धक्कादायक घटना घडली. येथे एका 32 वर्षांच्या तरुणानं चक्क 81 वर्षांच्या म्हाताऱ्याची वेष धारण करून अमेरिकेत पसार होण्याच्या तयारीत होता.  प्रवासापूर्वी आवश्यक असणाऱ्या परवानग्याही त्यानं मिळवल्या होत्या. एवढं करूनही त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. कारण त्याच्या संशयास्पद हालचालींवरून CISFच्या जवानांना संशय आला आणि विमान उड्डाण भरण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यानंतर त्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव जयेश पटेल असून तो अहमदाबाद येथील रहिवासी आहे.

(वाचा : झीरो डिग्री बारमध्ये रात्रभर लहान मुला-मुलींचा धिंगाना, धाड टाकल्यावर धक्कादायक खुलासा)

'नवभारत टाइम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पटेल अमरीक सिंह या नावानं न्यू यॉर्क येथे जात होता, अशी माहिती CISFनं दिली. यासाठी त्यानं म्हाताऱ्याचं सोंग घेतलं आणि व्हीलचेअरवरून तो विमानतळावर पोहोचला.

अंतिम टप्प्यात सुरक्षा रक्षकांकडून तपासणी सुरू असताना CISFनं त्याला रोखलं आणि व्हीलचेअरवरून उठवण्यास सांगितलं, तर त्यानं थेट नकार दिला. यानंतर बराच वेळ त्याची कसून चौकशी करण्यात आली. पण त्याच्याकडून योग्य उत्तरं मिळत नव्हती. यावरून तपास अधिकाऱ्यांचा त्याच्यावरील संशय बळावला.

(वाचा : आईच्या शरीराखाली गुदमरून 3 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू)

हा तर निघाला 32 वर्षांचा तरुण

CISFनं सांगितलं की, पासपोर्टवर आरोपीची जन्मतारीख 1 फेब्रुवारी 1938 नमूद करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होऊ नये, यासाठी त्यानं केस पांढरे केले होते. त्याला पारखून पाहिल्यानंतर त्याच्या त्वजेवरून तपास अधिकाऱ्यांना तो 81 वर्षांच्या म्हातारा असल्याचं वाटलं नाही. कसून चौकशी करण्यात आल्यानंतर आरोपी पोपटासारखा बोलू लागला. दुसऱ्या व्यक्तीच्या पासपोर्टवर अमेरिकेला जाण्याचा प्लान होता, असं त्यानं तपास अधिकाऱ्यांना सांगितलं.

(वाचा : दिराने केला वहिनी-पुतण्याचा खून; रात्रभर राहिला मृतदेहांसोबत)

VIDEO: हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या विरोधात का? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:02 AM IST

ताज्या बातम्या