क्राईम पेट्रोल बघून केलं ‘क्राईम’, 21 वर्षीय तरुणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला कट

क्राईम पेट्रोल बघून केलं ‘क्राईम’, 21 वर्षीय तरुणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला कट

सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला आहे

  • Share this:

इंदोर, 4 मार्च : 29 फेब्रुवारी रोजी आयडियल शाळेजवळून गायब झालेल्या 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाच्या कटामागील नेमकं कारण आता समोर आलं आहे. प्रियकरासोबत लग्न न झाल्याने तरुणीने स्वत:च्या अपहरणाची खोटी कहाणी रचली आहे. विशेष म्हणजे तिने सर्व प्लानिंग क्राईम पेट्रोल बघून केलं. यासंदर्भात पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर हा खुलासा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारी रोजी आयडियल शाळेजवळ अवंतिका नगर येथून 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाचे वृत्त समोर आले होते. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ती छोट्या बहिणीला आयडियल शाळेत सोडून दुपारी साधारण 12.30 वाजता घरी जात होती. यादरम्यान एक पांढऱ्या मारुती वॅनमधून आलेल्या चारजणांनी तिला मारहाण केले व जबरदस्तीने तिला गाडीत बसवले. या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर अपहरण झालेल्या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. त्यातूनही ही बाब उघड झाली आहे.

हे वाचा - बदलीसाठी पोलीस निरीक्षकाकडून पत्नीचा छळ, 15 लाखांसाठी दिली जीवे मारण्याची धमकी

पोलिसांनी सांगितले की तरुणीचं एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. तरुणीला त्याच्यासोबत लग्नही करायचे होते. मात्र तिच्या कुटुंबीयांचा या प्रेमाला नकार होता. यासाठी ते मुलीच्या लग्नाची घाई करीत होते. त्यांनी मुलं पाहाण्यात सुरुवातही केली होती. ते तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देणार होते. मात्र ही गोष्ट मुलीला आवडली नाही. कुटुंबीय आपलं लग्न दुसऱ्या मुलाशी करुन देतील या भीतीने तरुणीने स्वत:च्या अपहरणाचा कट रचला. हा संपूर्ण कट तिने क्राईम पेट्रोल पाहून केला. क्राईम पेट्रोल पाहताना तिला वेगवेगळे मार्ग सापडल्याचे तिने सांगितले.

First published: March 4, 2020, 9:16 AM IST

ताज्या बातम्या