अरे बापरे! लॉकडाऊनमध्ये उघडली स्टेट बँकेची बनावटी ब्रांच, सेटअप पाहता अधिकारी चक्रावले

अरे बापरे! लॉकडाऊनमध्ये उघडली स्टेट बँकेची बनावटी ब्रांच, सेटअप पाहता अधिकारी चक्रावले

लॉकडाऊनचा चांगला उपयोग करा, असं वारंवार सांगितलं जात आहे. त्यात या तरुणाने केले प्रकार पाहून लोकांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे.

  • Share this:

कडलोर, 11 जुलै : लॉकडाऊनमध्ये लोक काय करतील याचा भरवसा नाही. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात क्राईमच्या घटनांमध्ये मोठी घट झाली होती. त्यानंतर मात्र गेल्या काही आठवड्यांपासून क्राईममध्ये वाढ झाली आहे.

अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. येथील बनावट बँकेची ब्रांच उघडणार्‍या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

कुडलोर जिल्ह्यातील परूट्टी येथे स्टेट बँकेच्या माजी कर्मचार्‍याच्या 19 वर्षांच्या मुलाने स्टेट बँकेची बनावट शाखा उघडली होती. आता स्टेट बँकेच्या मूळ शाखेच्या व्यवस्थापकाला हे सेटअप पाहून आश्चर्य वाटले. कारण ते पूर्णपणे स्टेट बँकेप्रमाणेच तयार केले गेले होते. आता पोलिसांनी तिघांना अटक करून तुरूंगात पाठविले आहे.

एसबीआयच्या एका माजी कर्मचाऱ्याचा मुलगा कमल बाबूने संगणक, लॉकर, बनावट कागदपत्रे आणि इतर वस्तू बनावट बँकेत ठेवून अगदी बँकेसारखे तयार केले. अगदी पानरुटी मार्केटच्या नावाने एक वेबसाइट तयार केली गेली. अधिकारी तो सेटअप पाहून चाटच झाले. लॉकडाऊनमुळे या तरुणाने केलेला प्रताप समोर आल्यानंतर आता त्याला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. पोलिसांनी कमल तसेच ए कुमार (वय 42) आणि एम माणिकम यांना अटक केली आहे. लॉक़डाऊनमध्ये या लोकांनी एप्रिलमध्येच शाखा उघडली.

ग्राहकांनी चौकशी केली तेव्हा झाला पोलखोल

एसबीआयच्या एका ग्राहकाने उत्तर बाजार शाखेत या शाखेबाबत चौकशी केली असता या बनावट शाखेची पोल उघडकीस आली. जेव्हा एका ग्राहकाने या बनावट शाखेतील स्लिप उत्तर बाजार शाखेच्या व्यवस्थापकाला दाखविले तेव्हा त्यांना धक्का बसला. जेव्हा ते बनावट शाखेत पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. कारण या बनावट बँकेतही सर्व काही मूळ शाखेप्रमाणे होते. आता पोलिसांनी या तिघांविरोधात भादंवि कलम 473, 496, 484 आणि 109 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 10:35 PM IST

ताज्या बातम्या