'मतं मोदींना आणि काम मात्र माझ्याकडून... आता लाठीचार्जच करायला हवा' karnataka | HD kumaraswamy | pm modi | Narendra Modi

'मतं मोदींना आणि काम मात्र माझ्याकडून... आता लाठीचार्जच करायला हवा' karnataka | HD kumaraswamy | pm modi | Narendra Modi

निवेदन देण्यासाठी रास्ता रोको केला म्हणून मुख्यमंत्र्यांना आला राग...

  • Share this:

रायचूर, 26 जून: तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिली आणि आता तुमचे काम मी करावे अशी इच्छा आहे. तुमची अशी अपेक्षा आहे का की मी तुमचा आदर करावा? अशा शब्दात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी निवेदन देण्यास आलेल्या लोकांचा अपमान केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी रायचूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवर ते भडकले.

येरमरूस थर्मल पॉवर स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. कुमारस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांनी रास्ता रोको केला. या रास्ता रोकोमुळे मुख्यमंत्री भडकले आणि त्यांनी मोदींना मतदान केले आणि माझ्याकडून काम करून घेताय अशा शब्दात त्यांना सुनावले. मी तुमचा आदर का करू, तुम्ही निघा येथून नाही तर मला लाठीचार्ज करावा लागेल, अशा शब्दात निवेदन देण्यास आलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी हकलले.

मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण...

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मी 15 दिवसांचा वेळ मागितला होता. पण त्यांनी रास्ता रोको केला यामुळे राग आल्याचे ते म्हणाले. जर पंतप्रधान मोदींचा ताफा रोखला तर ते मान्य असेल का अशा प्रश्न देखील त्यांनी विचारला. राज्यातील सरकार सहिष्णु आहे पण असक्षम नाही. सरकारला माहिती आहे परिस्थितीशी कसे दोन हात करायचे, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

भाजपने केली टीका

निवेदन देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीची वागणूक दिल्याबद्दल भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. कुमारस्वामी यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागावी अशी मागणी भाजपचे प्रवक्ते एन.रवी कुमार यांनी केली. मुख्यमंत्री हे राज्यातील 6.5 कोटी लोकांचे आहेत ना की केवळ जेडीएस आणि काही आमदारांचे नाहीत, असे ही कुमार म्हणाले.

VIDEO: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 09:14 AM IST

ताज्या बातम्या