नवी दिल्ली, 24 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 8 वाजता देशभरात पुढील 21 दिवस लॉकडाऊन असल्याचं घोषित केलं. त्यांचं भाषण सुरू असतानाच नागरिकांनी पुढील 21 दिवस जीवनावश्यक दुकाने बंद होतील या भीतीने दुकानांबाहेर मोठी गर्दी केली. यानंतर मोदींनी ट्विट करुन बाहेर सुरू असलेल्या गोंधळावर चिंता व्यक्त केली.
By converging around shops, you are risking the spread of COVID-19.
No panic buying please.
Please stay indoors.
I repeat- Centre and State Governments will ensure all essentials are available. https://t.co/bX00az1h7l
मोदी ट्विट करुन म्हणाले, दुकानांबाहेर गर्दी करुन तुम्ही कोरोना पसरवत आहात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालता आहात. कृपया घबराट पसरवू नका. घरातच थांबा. अत्यावश्यक सर्व सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील. त्यामुळे घराबाहेर पडून वस्तू खरेदी करण्याची घाई करू नका. गर्दी टाळा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज भाषणात 21 दिवस देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढू नये यासाठी हे लॉकडाऊन आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही मोदींनी जनता कर्फ्यूचं (Janata Curfew) आवाहन केलं होतं. त्यानंतर आज सायंकाळी 8 वाजता मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे.